घरक्राईमनामामुख्यमंत्री योगींना ‘डकैत’ संबोधल्याप्रकरणी सपा नेत्याविरोधात गुन्हा

मुख्यमंत्री योगींना ‘डकैत’ संबोधल्याप्रकरणी सपा नेत्याविरोधात गुन्हा

समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह अडचणीत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं समाजवादी पक्षाच्या नेत्याला भोवले असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. योगी यांना ‘डकैत’ संबोधल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने आयपी सिंह यांच्यावर सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा आणि समाजातील शांतता बिघडवण्याचा आरोप केला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक एआय व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधित होता. काही माध्यमांच्या बातम्यांचा उल्लेख करत या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगींना ‘रहमान डकैत’ या रूपात नाचताना दाखवण्यात आले होते. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते, “९ वर्षांत पीडीए वर्गाचे आरक्षण गिळणारा डकैत.” यानंतर धर्म सिंह नावाच्या व्यक्तीने लखनऊ येथील हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर कारवाई करत पोलिसांनी आयपी सिंह यांच्याविरोधात आयटी कायदा आणि बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

धर्म सिंह यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की, “निराधार तथ्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एडिट केलेल्या फोटोसोबत व्हायरल केली जात आहेत. हे कृत्य जाणूनबुजून सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि विविध समाजघटकांमध्ये द्वेषभावना निर्माण करण्यासाठी करण्यात आले आहे. यामुळे सामाजिक सौहार्द बिघडण्याची आणि शांतता भंग होण्याची शक्यता आहे. असे आक्षेपार्ह व्हिडिओ पाहून माझ्यासह उत्तर प्रदेशातील लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे समाजात अशांतता, द्वेष आणि वैरभावना निर्माण होण्याची शक्यता आहे.” त्यांनी या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

‘लेबनॉन नव्हतंच करारात!’ व्हान्स यांचा खुलासा; शरीफ यांच्या दाव्यांवर प्रश्न

पाकिस्तानचे आर्थिक स्थैर्य संकटात

“विकसित भारतासाठी मातृशक्तीचे सामर्थ्य अत्यावश्यक”

“आम्ही पाकिस्तानला विश्वासार्ह देश मानत नाही” इस्रायली राजदूत असे का म्हणाले?

दरम्यान, ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना ‘रहमान डकैत’ संबोधणारे पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री योगींना ‘धुरंधर’ असे संबोधण्यात आले होते. यामुळे नाराज झालेल्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नंतर ते पोस्टर्स फाडून टाकले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version