घरक्राईमनामाधक्कदायक! कांदिवलीत चार रक्तरंजित मृतदेह आढळले

धक्कदायक! कांदिवलीत चार रक्तरंजित मृतदेह आढळले

- Advertisement -

मुंबईच्या कांदिवली परिसरतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवार, २९ जून रोजी रात्री उशिरा कांदिवली रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका बंद खाजगी रुग्णालयात चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यातील दोन जणांचे मृतदेह हे रक्तरंजित अवस्थेत आढळले तर दोघे जण पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका चालकाने प्रेमप्रकरणातून तीन महिलांची हत्या करून स्वतः गळफास घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये डॉक्टरची पत्नी आणि त्याच्या दोन मुलींची हत्या करत आत्महत्या केली आहे. कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकऱणाचा तपास सुरू केला आहे.

मृतांमध्ये एक ५५ वर्षाची महिला, तिच्या ३० आणि २५ वर्षाच्या दोन अविवाहित मुली आणि ५५ वर्षाचा त्यांचा वाहन चालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या सर्वांचे मृतदेह शताब्दी रूग्णालयात पाठवण्यात आले असून घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे.

हे ही वाचा:

उदयपूर मधील कन्हैयालालसाठी २४ तासात जमले १ कोटी

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर

कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द; बहुमत चाचणीची आता गरज नाही

मृत महिलेचा पती हा डॉक्टर असून उत्तर प्रदेशात राहण्यास आहे. कांदिवली येथे ही महिला दोन मुली आणि वाहन चालक राहत होते. वाहन चालकाचे २५ वर्षाच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते, मात्र महिला आणि तिच्या मोठ्या मुलीचा त्यांना विरोध होता. अखेर बुधवारी या वरून त्यांच्यात वाद झाला आणि रात्री वाहन चालकाने ५५ वर्षीय महिला आणि ३० वर्षाच्या मुलीची कोयत्याने वार करून हत्या केली, त्यानंतर २५ वर्षाच्या मुलीसोबत मृतदेहासमोर लग्न केले व त्यांनतर दोघांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चौघांची नावे अद्याप समोर आलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version