घरक्राईमनामाकुख्यात गुंड गजा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात

कुख्यात गुंड गजा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात

गजानन मारणे याच्यावर खंडणी आणि अपहरण प्रकरणी कारवाई

कुख्यात गुंड गजानन मारणेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साताऱ्यातील वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे यांच्या फार्महाउसवरून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गजानन मारणे याच्यावर खंडणी आणि अपहरण प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलीस गजानन मारणेला घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहेत. शेअर दलाल व व्यावसायिक व्यक्तीचे वीस कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण आणि मारहाण केली. याप्रकरणी गजानन मारणे याच्यासह १४ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत आदेश दिले होते.

भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिक व शेअर दलालाचे अपहरण केल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सोमवारी चार जणांना अटक केली होती. त्यांनतर गज्या मारणे आणि त्याचे साथीदार पसार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली होती. अखेर त्याचा शोध लागला आहे.

हे ही वाचा

नातेवाईकानेच लंपास केले ७५ लाखांचे सोने

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

दरम्यान, गज्या उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली,पलूस, सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६), फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली, सातारा), रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version