घरक्राईमनामाघाटकोपरमध्ये माणुसकीला काळिमा!  पित्याने नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकले

घाटकोपरमध्ये माणुसकीला काळिमा!  पित्याने नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकले

पित्याला अटक

पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादातून एका पित्याने आपल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलाला घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत आरव या चिमुरड्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी पिता जाफर शेख (२३) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आरती जाफर शेख (२२) आणि जाफर यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना आरव हा नऊ महिन्यांचा मुलगा आहे. जाफरला व्हाइटनर पिऊन नशा करण्याची सवय असून, त्यातून तो गेल्या वर्षभरापासून पत्नीशी किरकोळ कारणांवरून वारंवार वाद घालत असे.

हे ही वाचा: 

खर्गेंसमोर घोषणा देणारा ‘तो’ निघाला काँग्रेसचाच समर्थक

तिन्ही सैन्यदलांसाठी २.१२ लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी

मुंबईत बांधकामे आठवड्यातून एक दिवस बंद ठेवा!

ऑफिसच्या वेळेतच मध्य रेल्वेचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल

रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास आरती या आपल्या मुलासह घाटकोपर पश्चिम येथील स्कायवॉकवर थांबल्या होत्या. त्यावेळी जाफर तेथे आला. त्याने आरवला स्वतःसोबत घेऊन जाण्याचा हट्ट धरत पत्नीशी वाद घातला. त्यानंतर आरती यांच्या हातातून जबरदस्तीने मुलाला हिसकावून घेतले. शिवीगाळ करत त्याने दोघांनाही स्कायवॉकवरून फेकून देण्याची धमकी दिली.

आरती यांनी मुलाला परत देण्यासाठी जाफरकडे विनवणी केली. मात्र, रागाच्या भरात त्याने आरवला थेट स्कायवॉकवरून खाली फेकून दिले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्कायवॉकवरील प्रवाशांनाही या घटनेचा मोठा धक्का बसला.

डोक्याला गंभीर दुखापत; सायन रुग्णालयात उपचार

स्कायवॉकवरून खाली पडल्याने आरवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने रक्तबंबाळ अवस्थेतील बाळाला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आरती शेख यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी जाफर शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०९(१) (हत्येचा प्रयत्न), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक रीना लोहार करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version