घरक्राईमनामाजरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसआयटी

जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसआयटी

मुंबई पोलिसांकडून विशेष पथक गठीत

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले असून, त्यानुसार मुंबई पोलिसांनी तातडीने त्रिस्तरीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करणार आहे.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना तब्बल ५०० कोटी रुपये देण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी स्वतः पुढाकार घेत या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधारांचा पर्दाफाश करावा, अशी थेट मागणी सरकारकडे केली होती.

हे ही वाचा:

१०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी शिक्षणमंत्र्यांना अटक

चार सत्रांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराचे दमदार पुनरागमन

गृह, वित्त मंत्रालयाच्या इमारतीत धुराचे लोट

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातूनही ईशान किशन बाहेर

मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट आदेशानंतर मुंबई पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी त्रिस्तरीय एसआयटी गठीत करण्यात आली असून, तिची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. या ऑडिओ क्लिपचे मूळ, त्यातील आवाजांची सत्यता आणि त्यामागील कारस्थान शोधून काढण्याचे मोठे आव्हान आता या पथकासमोर असणार आहे.

​असे असेल ‘एसआयटी’ पथक :
​अध्यक्ष : शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त)
​सदस्य : विजयकांत सागर (पोलीस उपायुक्त)
​सदस्य : बजरंग बनसोडे (पोलीस उपायुक्त)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version