घरक्राईमनामालिंगबदल शस्त्रक्रिया जबरदस्तीने केल्याप्रकरणी चौघे जेरबंद

लिंगबदल शस्त्रक्रिया जबरदस्तीने केल्याप्रकरणी चौघे जेरबंद

मालाडमध्ये बीकॉम विद्यार्थ्यावर अत्याचार;

मालाड परिसरातील १९ वर्षीय बीकॉम विद्यार्थ्यावर स्थानिक तृतीयपंथी टोळीने जबरदस्तीने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणाने तक्रारीत अनेक महिने ब्लॅकमेल, शारीरिक-मानसिक छळ आणि खंडणीसारख्या गंभीर आरोपांची माहिती पोलिसांना दिली आहे.

कुरार गावातील अप्पापाडा येथील रहिवासी असलेल्या पीडिताची ओळख सुमारे दीड वर्षांपूर्वी कावेरी उर्फ कार्तिक निकमशी झाली. या माध्यमातून त्याची भेट नेहा खान उर्फ नेहा इप्टेशी झाली, जी मालवणीतील तृतीयपंथी गटाचे नेतृत्व करते. ५ ऑगस्ट रोजी नेहाच्या घरी बोलावून आरोपींनी विद्यार्थ्यास लिंगबदलासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. नकार दिल्यावर त्याला खोलीत बंद करून मारहाण करण्यात आली आणि अश्लील कृत्यांचे व्हिडिओ चित्रित करून त्याचा वापर खंडणीसाठी केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडिताच्या आईकडून बदनामीच्या भीतीपोटी दहा हजार रुपये वसूल करण्यात आले. त्यानंतर टोळीने आणखी पैशांची मागणी केली आणि विद्यार्थ्याचा सार्वजनिक अपमान केला. विद्यार्थ्यावर मारहाण करून साडी नेसवणे, भीक मागणे यासारखे अपमानास्पद कृत्ये करवून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

२८ ऑक्टोबरला नेहा, तिचा पती सोहेल खान, दत्तक मुलगा भास्कर आणि इतरांनी विद्यार्थ्यास सुरतला नेऊन रुग्णालयात जबरदस्तीने कागदपत्रांवर सही करून घेतली आणि लिंगबदल शस्त्रक्रिया केली, असा गंभीर आरोप पीडिताने केला आहे. मुंबईत परतल्यानंतर नेहाने त्याच्या जखमेवर गरम पाणी ओतून अत्याचार सुरूच ठेवला आणि सुटका करून देण्यासाठी साडेचार लाखांची मागणी केली.

हे ही वाचा:

एक डॉक्टर खुनशी, दहशतवादी कसा असू शकतो? हे आहे त्याचे उत्तर

चेन्नईत भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले; वैमानिक बचावला

बिहारी GEN-Z नेच चिरडले…

कगिसो रबाडा का नाही खेळला?

४ नोव्हेंबर रोजी पीडित कोणत्यातरी प्रकारे पसार झाला. मात्र, काही तासांत त्याचे पुन्हा अपहरण करण्यात आले. स्थानिक रहिवाशाच्या हस्तक्षेपामुळे त्याची सुटका शक्य झाली. कुरार पोलिसांनी शून्य एफआयआर नोंदवून प्रकरण मालवणी पोलिसांकडे वर्ग केले.

“पीडिताच्या जबाबावरून आरोपींवर कट रचणे, अपहरण, लैंगिक अत्याचार, खंडणी आणि जबरदस्तीने वैद्यकीय विच्छेदन या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version