घरक्राईमनामामालवणीत १४ बेकायदेशीर शाळांवर कारवाईचा बडगा; मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हे दाखल

मालवणीत १४ बेकायदेशीर शाळांवर कारवाईचा बडगा; मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हे दाखल

मुख्याध्यापकांविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा

मुंबईतील मालाड-मालवणी परिसरात सर्रासपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर शाळांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेने केलेल्या तपासणीत मुंबईत एकूण १६४ प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले असून, त्यापैकी सर्वाधिक शाळा एकट्या मालवणी परिसरात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या १४ शाळांच्या मुख्याध्यापकांविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत १६४ प्राथमिक शाळा बेकायदेशीर असल्याचे आढळून आले होते. यामध्ये मालवणी परिसरातील १४ शाळांचा समावेश होता. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या शाळांवर कायदेशीर कारवाईचा भाग म्हणून, महापालिकेने मार्च २०२६ मध्ये संबंधित १४ शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावली होती.

हे ही वाचा:

लेबनॉनमधील हल्ल्यांमध्ये १८ जण ठार; इराण-अमेरिका शांतता चर्चा रद्द?

राजीव बलियान असल्याचे सांगितले…निघाला अशफाक, विधवेला ओढले जाळ्यात

विश्वचषक फुटबॉलमधून ‘फिफा’च्या कमाईचा अचूक ‘गोल’

होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजवाहतूक पुन्हा सुरू

बजावण्यात आलेल्या नोटिशीनुसार, या शाळा का बंद करण्यात येऊ नयेत, याचे स्पष्टीकरण एका आठवड्याच्या आत सादर करणे बंधनकारक होते. मात्र, मुख्याध्यापकांनी या नोटीसकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या नोटिशीला कोणताच प्रतिसाद न देता, या शाळा सर्रासपणे सुरू ठेवण्यात आल्या.

प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने महानगर पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने या सर्व १४ शाळांची नावे, त्यांचे पत्ते आणि बजावलेल्या नोटिसांच्या प्रतीसह सविस्तर अहवाल मालवणी पोलिसांना सादर केला. या अहवालाच्या आधारे मालवणी पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर शाळा चालकांचे धाबे दणाणले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version