घरक्राईमनामाकोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू !

कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू !

परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात वाद होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. सचिन कांबळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वर्षभरापासून सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून दोन गटात ही हाणामारी झाली. यामध्ये एकाचा मृत्यू तर अन्य एक जण जखमी झाला आहे. रुई गावातील साठेनगर आणि माळावरच्या मुलांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसमुस चालू होती. गावकऱ्यांनी मध्यस्थी घेत हा वाद मिटवला होता. परंतु, शनिवारी (१७ ऑगस्ट ) मध्यरात्री २ च्या सुमारास दोन्ही गट आपापसात भिडले. यामध्ये सचिन कांबळे या तरुणावर धारधार शस्त्राने वार कडून त्याची हत्या करण्यात आली. यामध्ये मृत सचिनचा मित्र देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा:

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाला केंद्राची मंजुरी

गंगा नदी मार्गावरील पुलाचा एक भाग तिसऱ्यांदा कोसळला

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी कारवाई होणार, राज्यपालांनी दिली मंजुरी !

‘त्या’ डॉक्टरच्या हत्या प्रकरणी महिला आयोग आक्रमक

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींवर जो पर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत सचिन कांबळेचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version