घरक्राईमनामाइनोव्हा मधून पीपीई किट घालून उतरलेल्या व्यक्तीचे गुढ उलगडले?

इनोव्हा मधून पीपीई किट घालून उतरलेल्या व्यक्तीचे गुढ उलगडले?

- Advertisement -

अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या केसने वेगळेच वळण घेतले आहे. या संदर्भात एक पांढरी इनोव्हा देखील सापडली होती. या गाडीतून पांढऱ्या रंगाचा पीपीई किट घातलेली एक व्यक्ती उतरली होती. ही व्यक्ती म्हणजेच एपीआय सचिन वाझे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या वाझे यांना न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे याला एनआयए कडून अटक करण्यात आली. वाझे याच्या अटकेनंतरच पोलिसांना इनोव्हा गाडीचाही शोध लागला. ही इनोव्हा गाडी मुंबई पोलिसांच्या सीआययू पथकाच्या नियमित वापरतील गाडी होती अशी माहिती मिळत आहे. याच विशेष पथकाचे सचिन वाझे हे प्रमुख होते. त्याबरोबरच या गाडीची नंबरप्लेट देखीव वारंवार बदलली गेली असल्याची माहिती आता पुढे येत आहे. बनावट नंबरप्लेट बनवणाऱ्या व्यक्तिचा पोलिसांकडून शोध चालू आहे. शिवाय या गाडीच्या चालकांची ओळख देखील पटल्याचे कळत आहे.

अंबानींच्या घराबाहेर सापडललेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीसोबतच एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडीसुद्धा आढळून आली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतही या इनोव्हा गाडीचा उल्लेख केला होता. या इनोव्हा गाडीचा प्रवासही मनसुख हिरेन यांच्या स्कॉर्पिओ गाडीच्याच रस्त्यावरून झाल्याचे फडणवीसांनी म्हटले होते. नंतर या इनोव्हाशी संबंधित सीसीटिव्ही चित्रणही समोर आले होते. काल रात्री पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version