घरक्राईमनामाविमानतळावर प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालकाचा पर्दाफाश

विमानतळावर प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालकाचा पर्दाफाश

पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रंगेहात अटक

मुंबई विमानतळ परिसरात प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळणे, दमदाटी करणे आणि विरोध करणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार करणाऱ्या एका रिक्षाचालकाला सहार वाहतूक पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध स्टिंग ऑपरेशन राबवून रंगेहात पकडले. विमानतळावर येणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांची सातत्याने फसवणूक होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी साध्या वेशात प्रवासी बनून सापळा रचला आणि आरोपीला गुन्हा करतानाच अटक केली.

मोहम्मद अस्लम शेख (वय ४५) हा रिक्षाचालक विमानतळाबाहेर प्रवाशांना गाठून मीटर न लावता मनमानी भाड्याची मागणी करत असे. प्रवाशांनी विरोध केल्यास त्यांना धमकावून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा त्याचा प्रकार सुरू होता. याच तक्रारींची शहानिशा करण्यासाठी सहार वाहतूक पोलिसांच्या पथकाने विमानप्रवासी असल्याचे भासवत त्याच्याशी संपर्क साधला. आरोपीने नेहमीप्रमाणे जादा भाड्याची मागणी केली आणि पैशांवरून वाद घालत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी जाणार सेशेल्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

भारतावर ॲमेझॉनचा ₹४.१ लाख कोटींचा विश्वास!

ड्रग्ज, शस्त्रे, हवाला रॅकेट प्रकरणी अफगाण नागरिकासह सात जण अटकेत

बंगालमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याप्रकरणी स्थानिक नेत्याला अटक

या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध खंडणी, धमकावणे आणि संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत अशाच प्रकारे अनेक प्रवाशांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्याच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे. विमानतळ परिसरात प्रवाशांची सुरक्षितता आणि अनधिकृत भाडेवसुली रोखण्यासाठी अशा प्रकारच्या स्टिंग ऑपरेशन्स पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version