घरक्राईमनामासलग पाचव्या दिवशी पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; कुपवाडा, बारामुल्लामधील चौक्या लक्ष्य

सलग पाचव्या दिवशी पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; कुपवाडा, बारामुल्लामधील चौक्या लक्ष्य

भारताकडून चोख आणि प्रभावी प्रत्युत्तर

कुरापती पाकिस्तानच्या कुरघोडी सीमावर्ती भागात सुरूचं असून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या नापाक कारवाया सुरूचं आहेत. सलग पाचव्या दिवशी पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर (एलओसी) गोळीबार केला आहे. भारताने या कारवायांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तान दररोज रात्री हलक्या शस्त्रांनी गोळीबार करत आहे.

पाकिस्तानी सैन्याने २८ एप्रिल – २९ एप्रिलच्या रात्री नियंत्रण रेषेवर (एलओसी) लहान शस्त्रांनी गोळीबार केला. यावेळी त्यांनी कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांसमोरील भागांना तसेच अखनूर सेक्टरला लक्ष्य केले. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराचा हा सलग पाचवा दिवस होता. पाकिस्तानच्या या कारवायांना भारतीय लष्कराने चोख आणि प्रभावी पद्धतीने प्रत्युत्तर दिले. “२८-२९ एप्रिलच्या रात्री, पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर तसेच अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार केला. भारतीय सैन्याने या चिथावणीला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले,” असे भारतीय सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी कारवाया वाढवल्या आहेत, त्यामुळे नियंत्रण रेषेवर तणाव कायम आहे. अशातच पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यापूर्वी २७-२८ एप्रिल २०२५ च्या रात्री, कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी कोणत्याही चिथावणीशिवाय लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराच्या जवानांनीही या हल्ल्याला जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. तर, २६- २७ एप्रिल २०२५ च्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी तुतमारी गली आणि रामपूर सेक्टरच्या समोरील भागात नियंत्रण रेषेवर विनाकारण लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केला होता.

हेही वाचा..

पाकिस्तानसमोर मोठा प्रश्न : नवाज यांनी पीएम शहबाजना काय सल्ला दिला?

“पाकिस्तानसोबत चर्चा नकोच! कारवाई करा…” पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?

“मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींचे त्यांच्या पक्षावर नियंत्रण नाही का?”

“पहलगाम सारख्या घटनेबद्दल माफी मागण्यासाठी शब्द नाहीत”

दुसरीकडे, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराच्या तयारीची माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील (एलओसी) अनेक भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्यानंतर काही तासांतच त्यांची ४० मिनिटांची बैठक झाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version