घरक्राईमनामाआठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैगिंग अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैगिंग अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीवर मागील दोन महिन्यापासून लैगिंग अत्याचार करून त्याचा व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील दोन महिन्यापासून लैगिंग अत्याचार केला असल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी या दोघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अटक करण्यात आलेले दोघे २१ ते २२ वयोगटातील तरुण असून पीडित मुलगी अवघ्या १३ वर्षाची आहे. पीडिता आणि आरोपी हे मालाड पश्चिम येथील बांगूर नगर परिसरात राहणारे आहेत. दोन महिन्यांपूर्वी या दोघांनी दुपारच्या वेळी पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैगिंग अत्याचार केला आणि त्याचा व्हिडीओ तयार केला होता. मागील दोन महिन्यापासून हे दोघे तिला व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर आळीपाळीने लैगिंग अत्याचार करत होते.

हे ही वाचा:

किरीट सोमय्यांना पुणे महापालिका परिसरात शिवसैनिकांची धक्काबुक्की

पवित्र मंत्रोच्चारात पंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चे उद्घाटन

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी

मुंबई, ठाण्यात जिओ नेटवर्क गायब!

दोन दिवसांपूर्वी पीडिता ही शाळेतून घरी आली असता या दोघांनी तिला पुन्हा घरी बोलावून धमकावले आणि तिच्यावर लैगिंग अत्याचार केला. या दोघांच्या कृत्याला कंटाळून अखेर तिने हा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. मुलीवर दोन महिन्यापासून होणाऱ्या लैगिंग अत्याचारामुळे पालक हादरले. त्यानंतर त्यांनी थेट बांगूर नगर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून या दोन्ही तरुणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध लैगिंग अत्याचार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version