घरक्राईमनामाधक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणी एका तरुणाची आणि तरुणीची हत्या करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. तरूणाची बंदुकीने गोळी मारून तर तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. तरुणीच्या १७ वर्षीय अल्पवयीन भावानेच या दोघांची हत्या केल्याचे समोर आले आहे. वर्षा कोळी (वय 20) आणि राकेश संजय राजपूत (वय २२) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

तरुणीच्या १७ वर्षीय अल्पवयीन भावाने दोघांचा जीव घेतल्यानंतर तो स्वतः पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन भावासह एकाला ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरु आहे.

हे ही वाचा:

समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA कडून दहाव्या आरोपीला अटक

एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच

कर्नाटकात ख्रिश्चन शाळेत मुलांच्या हातावरील राख्या काढून फेकल्या

राकेश आणि वर्षा यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि ते पळून जाणार होतो. याबाबत वर्षाच्या भावाला कळल्यानंतर त्याने दोघांचीही हत्या केली. त्यांना मारण्यापूर्वी दोघांना बाईकवरुन बसून आणण्यात आलं होतं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. परिसरात पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version