घरक्राईमनामासाधू मारहाण प्रकरणी सहाजण ताब्यात

साधू मारहाण प्रकरणी सहाजण ताब्यात

सांगलीतील लवंगा गावात लहान मुलांना पळवणारी टोळी समजून चार साधूंना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

सांगलीतील लवंगा गावात लहान मुलांना पळवणारी टोळी समजून चार साधूंना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं असून आणखी १० ते १२ आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून चार साधू कर्नाटक येथे देवदर्शनाला आले होते. तिकडून ते लवंगामार्गे विजापूर येथे जात होते. यावेळी त्यांनी रस्त्यात एका विद्यार्थिनीला विजापूरला जाणारा रस्ता हाच का अशी विचारणा केली. त्यावेळी ही मुळे पळवणारी टोळी असल्याच्या समजुतीने काही लोकांनी या साधूंना बेदम मारहाण केली. त्यांना गाडीतून खेचून काढत बेल्ट आणि काठीने मारहाण केली. यावेळी आपण साधू असल्याचे त्यांनी सांगूनही जमावाने त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. शिवाय या साधुंनी ओळखपत्र आणि आधार कार्ड दाखवूनही जमावाने मारहाण सुरूच ठेवली. अखेर पोलिसांच्या मध्यस्तीने मारहाण थांबवण्यात आली.

यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर १० ते १२ जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात ‘या’ सेवा मिळणार मोफत

गाेव्यामध्ये काॅंग्रेसचे आठ आमदार ‘पदयात्रा’ करत भाजपात

आमदार बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

या घटनेनंतर राज्यभरातून यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version