घरक्राईमनामापुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या

पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या

दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली असून त्यात प्रामुख्याने कोयता गँगच्या दहशतीत वाढत होताना दहशतीत वाढ झाली आहे. यापूर्वी पोलिसांनी अनेकांच्या मुसक्या आवळल्या असूनही कोयता गँगचा हैदोस संपताना दिसत नाही. अशीच एक थरारक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात पाठलाग करत कोयत्याने हल्ला करत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यात कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. पाठलाग करून कोयत्याने हल्ला करून खून केला आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. हेल्लेखोराने पाठलाग करत तरूणाला इमारतीच्या छतावर गाठले आणि कोयत्याने वार करत तरुणाची हत्या केली. किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करत खून केल्याची महिती समोर आली आहे.

पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली आहे. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार, सिद्धार्थ आणि आरोपींचे काही वाद झाले होते. त्यानंतर आरोपी कोयते घेऊन त्याच्यामागे लागले. तेव्हा धावत तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार 

दुसरीकडे, किरकोळ कारणावरून पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार करण्यात आला आहे. हल्ल्यात एक तरुण जखमी झाला असून निलेश पिंपळकर असे फिर्यादीचे नाव आहे. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे असे आरोपींचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचा एक जिवंत राऊंड आणि दोन केसेस जप्त केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version