घरक्राईमनामा“ती चूक होती आणि आता...” NAAC च्या नोटीसला अल- फलाह विद्यापीठाने काय...

“ती चूक होती आणि आता…” NAAC च्या नोटीसला अल- फलाह विद्यापीठाने काय दिले उत्तर?

१२ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस दिली होती

दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटात वैद्यकीय महाविद्यालयातील सदस्यांचा समावेश असल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. अशातच फरीदाबादच्या अल- फलाह विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (NAAC) १२ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस दिली होती. या नोटीसला आता विद्यापीठाने आपले उत्तर सादर केले आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठाने मान्य केले की, त्यांच्या वेबसाइटवरील जुने मान्यता दावे हे वेबसाइट- डिझाइन त्रुटी आणि इतर काही त्रुटी याचे परिणाम आहेत. विद्यापीठाने याबद्दल माफी मागितली असून NAAC ला कळवले की दिशाभूल करणारे दावे आता काढून टाकण्यात आले आहेत. सध्या पुढील कोणतीही कारवाई करण्याचा विचार केला जात नाही. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, अल- फलाह प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, NAAC ने कालबाह्य झालेले मान्यता ग्रेड दाखवणाऱ्या सुमारे २५ इतर संस्थांना नोटिसा बजावल्या आहेत आणि त्यांना अशी माहिती काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

पाकिस्तान धुमसतोय; पीटीआय आणि टीटीएपीची देशव्यापी निदर्शने

मालवणी पॅटर्नवरून मंत्री मंगलप्रभात लोढांना अस्लम शेखची धमकी

देशभरातील घुसखोरांना शोधून हाकलणार!

चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे किलकिले

अल- फलाह मेडिकल कॉलेजमधील अनेक डॉक्टरांचा लाल किल्ला ब्लास्टमध्ये झालेल्या हल्ल्याशी संबंध असल्याचे समोर येताच दोन दिवसांनी NAAC ची अल- फलाह विद्यापीठाला नोटीस आली होती. संस्थेने विद्यापीठाला पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दाखवल्याबद्दल फटकारले होते. ज्यामध्ये २०१३ पासून त्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी “अ ग्रेड” आणि २०११ पासून त्यांच्या शिक्षक शिक्षण शाळेसाठी मान्यता समाविष्ट होती, जरी NAAC मान्यता फक्त पाच वर्षांसाठी वैध आहे. नोटीसमध्ये विद्यापीठाला सर्व खोटे दावे काढून टाकण्याचे, अनुपालन अहवाल दाखल करण्याचे आणि सात दिवसांच्या आत प्रतिसाद देण्याचे निर्देश देण्यात आले होते. अल- फलाह विद्यापीठाने त्यांच्या वेबसाइटवर जुनी मान्यता माहिती का आहे याबद्दल एक लांब स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की ही एक चूक होती किंवा वेबसाइट- डिझाइन चूक होती आणि आता माहिती काढून टाकण्यात आली आहे, असे NAAC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version