घरक्राईमनामासंजय राऊतांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक

संजय राऊतांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक

खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊतांना जीवे मारण्याची धमकी  

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकाच दिवसात महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर धमकी प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना धमकी प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्या फोनवर संजय राऊत यांना धमकी देण्यात आली होती. याची ऑडियो क्लिपही व्हायरल झाली होती. फोन करणारा व्यक्ती हिंदीतून बोलत असून त्याने संजय राऊत यांना सकाळी ९ चा भोंगा बंद करायला सांगा, त्यासाठी एका महिन्याची मुदत देतो, अन्यथा त्यांना गोळी मारु, अशी धमकी दिली होती. महिन्याभरात दोन्ही भावांना गोळी मारुन स्मशानात पोहचवणार असल्याचेही धमकी देणाऱ्याने म्हटले.

हे ही वाचा:

आठ लाखांची लाच घेताना आयएएस अधिकाऱ्याला पकडले

चित्रा वाघ संतापल्या, आव्हाड नाही…हाड हाड!

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर आशिया कप, वर्ल्ड कप मोफत पाहता येणार

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत महिन्याभरात १६३ मुले पुन्हा कुटुंबीयांकडे परतली!

संजय राऊत आणि सुनील राऊत यांना आलेल्या धमकी प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. तसेच सुनील राऊत यांनी यासंदर्भातील ऑडियो क्लिप मुंबई पोलिसांना दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version