घरक्राईमनामाठाण्यात उबाठा नेते प्रदीप ‘बाळा’ पूर्णेकर यांच्यावर गोळीबार

ठाण्यात उबाठा नेते प्रदीप ‘बाळा’ पूर्णेकर यांच्यावर गोळीबार

दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती

ठाण्यात उबाठाचे विभागप्रमुख प्रदीप ‘बाळा’ पूर्णेकर यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. मानपाडा येथील गणेशनगर परिसरातील त्यांच्या कार्यालयात रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात पूर्णेकर यांच्या शरीराला दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांना तातडीने कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इन्फिनिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूर्णेकर हे मंगळवारी रात्री काही सहकाऱ्यांसह कार्यालयात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. दोन गोळ्या लागल्यानंतर पूर्णेकर जखमी झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.

हे ही वाचा:

सामना एकीकडे, पाकिस्तानी व्हॉलीबॉल संघ गेला दुसरीकडे

आंदोलन केले तर ‘कॉक्रोच’ना दादरकर देणार दणका

बांगलादेशात अणुइंधन नेणाऱ्या रशियन विमानाला पाकने एअरस्पेस नाकारली

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. हल्लेखोर कोण होते, त्यांनी कोणत्या दिशेने पलायन केले, तसेच गोळीबारासाठी कोणते शस्त्र वापरले याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जखमी पूर्णेकर यांना आर मॉलजवळील इन्फिनिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उबाठाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली.

गोळीबारामागील नेमके कारण, हल्लेखोरांची ओळख आणि पूर्णेकर यांची वैद्यकीय स्थिती याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version