घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणएक दिवसाआड झालेल्या पत्रकार परिषदांचा अजब योगायोग!

एक दिवसाआड झालेल्या पत्रकार परिषदांचा अजब योगायोग!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर, मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल केला. ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ या उपक्रमाच्या विरोधात आदळआपट केली. एकगठ्ठा मतपेढीला आश्वस्त केले की, आम्ही गप्प बसलो नाही, तुमच्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात लढायला सज्ज आहोत. २४ सप्टेंबर रोजी ही पत्रकार परिषद झाली. योगायोग म्हणजे एक दिवस आधी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेची पत्रकार परिषद झाली. देशातील न्यायपालिका पूर्णपणे अपयशी झालेली आहे, असा दावा मौलाना मेहमुद मदनी यांनी या पत्रकार परिषदेत केला. दोन घटनात्मक संस्थांना दिवसाआड झालेल्या पत्रकार परिषदांमधून लक्ष्य करण्यात आले. हा जर योगायोग असेल तर तो अजब योगायोग आहे. देशात काँग्रेसची एक इकोसिस्टम कार्यरत आहे. ती मजबूत आहे. सगळे घटक परस्पर समन्वयाने काम करत असतात. त्यांच्या रणनीतीत कमालीचे सामंजस्य, समन्वय दिसतो. संसद, प्रशासन, न्यायपालिका, निवडणूक आयोग या खांबांवर देशाची लोकशाही तरलेली आहे. काँग्रेसने बदनामीचे शेणगोळे फेकून या घटनात्मक संस्थांना सातत्याने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. हा मारा फक्त एका बाजूने होत नाही. सगळेच या दिशेने कामाला लागले आहेत. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेबाबत बरीच चर्चा झाली. तुलनेने मौलाना मदनी काय बोलले, याकडे फार लोकांचे लक्ष गेले नाही. जमियत उलेमा-ए-हिंद ही मुस्लिमांची अत्यंत जहाल अशी देशव्यापी संघटना आहे. संघटनेचे लोक देशभरात फिरून मुस्लिमांना कट्टरतेचे धडे देत असतात. या संघटनेची तातडीची कार्यकारिणी नवी दिल्लीतील त्यांच्या बहादूरशाह जफर मार्गावरील केंद्रीय कार्यालयात पार पडली

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version