घरक्राईमनामामेट्रो बांधकाम साइटजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह

मेट्रो बांधकाम साइटजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळ शांती नगर येथील एका बॅरिकेडजवळ मेट्रो स्थानकाच्या बांधकामाच्या साइटवर एक सुटकेस सापडली असून त्यात महिलेचा मृतदेह आढळला आहे. येथे एक सुटकेस बेवारस अवस्थेत असल्याचे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता या सूटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला.

‘सीएसटी रोड येथील शांतीनगर येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू असल्याच्या ठिकाणी एक सूटकेस बेवारस पडली असल्याची माहिती पोलिसांना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली,’ अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली.

पोलिस तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी ती सुटकेस उघडली. तेव्हा त्यांना त्यात महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जाहीर

‘मेड इन इंडिया’ अंतर्गत एचपी, डेल सारख्या कंपन्या भारतात उत्पादन करणार

गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाखाली सापडला ५५ मिटरचा बोगदा

भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?

या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. या महिलेचे वय २५ ते ३५ दरम्यान असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र फॉरेन्सिक चाचणीनंतरच याबाबत ठोस माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. या महिलेने टी-शर्ट आमि ट्रॅक पँट असा वेश परिधान केला होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मारेकऱ्याच्या तपासासाठी पोलिस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version