घरधर्म संस्कृतीराम मंदिरावरील धर्मध्वजाबद्दल जाणून घ्या ‘या’ विशेष गोष्टी!

राम मंदिरावरील धर्मध्वजाबद्दल जाणून घ्या ‘या’ विशेष गोष्टी!

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून आता मंदिरावर ध्वज फडकवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात ध्वजारोहण होईल. विवाह पंचमीनिमित्त हा समारंभ आयोजित केला जात आहे. ध्वजारोहण समारंभासाठी गेल्या काही दिवसांपासून विशेष तयारी सुरू आहे. तयारीची विशेष चर्चा सुरू असून ध्वजाबद्दलही लोकांना आकर्षण आहे.

राम मंदिरावर फडकवला जाणाऱ्या ध्वजाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कडक सूर्यप्रकाश आणि मुसळधार पावसाचा परिणाम त्याच्यावर होणार नाही अशाप्रकारे ध्वजाची रचना करण्यात आली आहे. राम मंदिरावर फडकवलेल्या ध्वजाचा रंग भगवा असून दुरूनच हा ध्वज लक्ष वेधून घेणार आहे. राम मंदिरासाठी बनवलेल्या ध्वजावर वृक्षाच्या प्रतिमेसह सूर्य देव आणि ओम यांचे प्रतीक आहे. हा ध्वज २० फूट लांब आणि १० फूट रुंद आहे आणि त्याचे वजन २ ते ३ किलोग्रॅम आहे. अहमदाबादमधील एका पॅराशूट तज्ञाने हा ध्वज डिझाइन केला आहे.

राम मंदिराचा ध्वज कोणत्याही हवामानाला झेलू शकतो अशाप्रकारे तयार करण्यात आला आहे. प्रत्येक ऋतूत हा ध्वज मजबूत आणि फडकत राहील अशा उद्देशाने ध्वज बनवण्यात आला आहे. मंदिराचा ध्वज एव्हिएशन-ग्रेड पॅराशूट नायलॉन आणि सिल्क वापरून हस्तनिर्मित केलेला आहे. त्यामुळे तो कडक सूर्यप्रकाश किंवा मुसळधार पाऊस सहन करू शकतो. तसेच ध्वज बनवण्यासाठी एकूण तीन थरांचा वापर करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

आधीच दिल्लीत प्रदूषण; त्यात आली इथियोपियाची राख

पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेला अटक

“सिंध भारतात परत येऊ शकतो, सीमा बदलू शकतात”

दिल्लीत प्रदूषणाविरुद्धच्या आंदोलनात माओवादी कमांडर माडवी हिडमाचे पोस्टर्स

राम मंदिरात फडकवलेला हा ध्वज प्रतिष्ठेचा, एकतेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा संदेश देतो. हा ध्वज रामराज्याच्या आदर्शांचे प्रतीक मानला जातो. श्री राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी स्पष्ट केले की, हा “धर्मध्वज” त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या घटकांना लक्षात घेऊन हा विशेष ध्वज तयार करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version