घरधर्म संस्कृतीश्रीराम मंदिराच्या चित्ताकर्षक सुशोभीकरणाने लक्ष वेधले

श्रीराम मंदिराच्या चित्ताकर्षक सुशोभीकरणाने लक्ष वेधले

संजय ढवळीकर यांनी पुन्हा पार पाडली जबाबदारी

मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या कळसावर धर्मध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली, त्यावेळी मंदिर आणि मंदिराचा परिसर सुशोभित करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनीच यशस्वीरीत्या पार पाडली.

रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक सोहळ्यावेळीही या सुशोभीकरणाची जबाबदारी ढवळीकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. पुन्हा एकदा त्यांना ही संधी मिळाली.

हे ही वाचा:

दुबईस्थित ड्रग्ज तस्कर पवन ठाकूरला अटक; भारतात पाठवणार

हिंदूराष्ट्र घोषित करण्याची आता गरजच नाही…

धर्मध्वज फडकवल्यानंतर शतकानुशतकांच्या जुन्या जखमा भरून आल्या!

प्रभू श्रीराम मंदिराच्या कळसावरील ध्वजारोहण हा नव्या युगाचा शुभारंभ

ते यासंदर्भात म्हणाले की, या सुशोभीकरणात वेगवेगळी फुले वापरण्यात आली, कुंड्या, रांगोळी यांच्या आधारे ही सजावट केली गेली. वेगवेगळ्या संकल्पनाही तिथे उपयोगात आणल्या गेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पूजनीय सरसंघचालक मोहनराव भागवत ज्या मार्गाने येतील तिथे खास सुशोभीकरण केले गेले होते. प्रभू श्रीरामांचा संपूर्ण प्रवास, रामायण याचे चित्रण या सुशोभीकरणात रेखाटण्यात आले आहे.

रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेवेळी दीड महिन्यात ते काम पूर्ण करायचे होते. तेही काम ढवळीकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version