काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचं एक पुस्तक १० नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. त्यांचा आत्तापर्यंत यांचा जीवन प्रवास हा त्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यामुळे त्या पुस्तकाबद्दल सध्या मीडियामध्ये बरीच चर्चा केली जात आहे. त्या अनुषंगाने त्यांची एक मुलाखत द हिंदूमध्ये घेण्यात आली. त्या मुलाखतीच्या माध्यमातून काही त्यांचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्यामधला एक मुद्दा त्यांनी असा उपस्थित केला जो अर्थात सदर पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर सोनिया गांधींनी त्याचे उत्तर दिले. तो प्रश्न असा होता की नरेंद्र मोदी यांचा जो काही आत्ताचा राजकीय प्रवास आहे, त्या प्रवासातून काँग्रेसला काही घेण्यासारखे आहे का, काँग्रेसने त्याच्यातून धडा वगैरे घेतलेला आहे का? त्यावर सोनिया गांधींचे जे उत्तर होतं तो एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. सोनिया गांधी त्यावर म्हणाल्या की त्यांचा विचार किवा त्यांची विचारधारा ही आमच्या विचारधारेपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे अर्थात त्यातून काय घेण्यासारखं नाही पण त्यांनी दोन उदाहरण दिली एक म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग जे भारताचे माजी पंतप्रधान होते आणि सध्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे. त्या म्हणाल्या की काँग्रेसमध्ये या दोन व्यक्ती आहेत ज्यांनी किती निष्ठेने काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. मनमोहन सिंग आणि मल्लिकार्जुन खरगे हे राजकारणात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपा, मोदी यांच्याकडून काही घेण्यासारखं नाही.
सोनिया गांधींनी या दोन नेत्यांवर जो विश्वास व्यक्त केला त्यामागे एक कारण आहे ते म्हणजे हे दोन्ही नेते स्वयंप्रकाशित नेते नाहीत. स्वयंप्रकाशित म्हणजे काय ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर एक संघटन उभं केलं किंवा स्वतःच्या चेहऱ्यावर काहीतरी कमाल घडवून दाखवली, पक्षाला एक उंची गाठून दिली पण तसं काही या दोन नेत्यांच्या बाबीत दिसत नाही. भलेही मनमोहन सिंग हे पंतप्रधान असले तरी देखील सोनिया गांधी काय सांगतील किंवा गांधी कुटुंबाकडून जे काही आदेश येतील त्यांचं पालन करणं, त्यानुसार वागणं त्यानुसार धोरण आखणं हे त्यांचं काम होतं. त्या काळात एक ॲडव्हायझरी कमिटी सुद्धा तयार केली होती. भलेही मनमोहन सिंग पंतप्रधान असतील पण त्याला सल्ला देणारी अशी एक समिती होती, त्याच्यामध्ये सोनिया गांधी होत्या. खरं तर, असं कधी कुठल्या पक्षात झालेलं नाही. लोकशाही मार्गाने जेव्हा सरकार निवडून येतं तेव्हा सगळे अधिकारी पंतप्रधानांकडे असतात. पंतप्रधान आपली धोरण ठरवतात, आपलं व्हिजन ठरवतात, आपले निर्णय घेतात. अधिकार पंतप्रधानांचाच असतो. पण काँग्रेस सरकारमध्ये मात्र ॲडव्हायझरी कमिटी सर्वेसर्वा होती. अर्थात सोनिया गांधी किंवा गांधी कुटुंब सांगेल त्या पद्धतीने काम करायचं, त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचं. त्यामुळेच त्यांना मनमोहन सिंग आणि मल्लिकार्जुन खरगे हे अधिक यशस्वी वाटत असतील तर त्यात वावगे काय?
आपण असे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत, ज्यात सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते त्यावेळेला परदेशातून आलेल्या लोकांना भेटण्यासाठी सोनिया गांधी पुढे असत. तर मनमोहन सिंग मात्र बाजूला उभे असत. सोनिया गांधी यांचा कोणताही संबंध नव्हता, त्या कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हत्या पण त्या भेट घेत असत मनमोहन सिंग यांना दुय्यम स्थान मिळते आहे असेच वाटत असायचे. त्यामुळे सोनिया गांधी त्यांना यशस्वी म्हणतात, निष्ठावान म्हणतात. मल्लिकार्जुन खरगे यांचं तरी काय वेगळं आहे. मल्लिकार्जुन खरगे सुद्धा स्वयं प्रकाशित नाहीत त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलेलं आहे पण तरी देखील त्यांना कोणाचं ऐकावं लागतं तर गांधी कुटुंबीयांचंच ऐकावं लागतं. हे दोन नेते सोनिया गांधींना यशस्वी त्यामुळेच वाटतात कारण ते परप्रकाशित आहेत गांधी कुटुंबांच्या प्रकाशामुळे जे काही तेज दिसतं त्यांचं ते गांधी कुटुंबाचं तेज आहे आणि त्यामुळे त्यांना ते यशस्वी वाटतात.
हे ही वाचा:
संघ,मोदींकडून शिकण्यासारखे काहीच नाही!
कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपींवर दहशतवादाचा खटला चालणार!
दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!
कर्नाटकात आलेल्या केरळमच्या बसवर दाऊदचा उदोउदो!
त्या म्हणतात की, मोदींकडून काय शिकण्यासारखं आहे. त्या अर्थाने ते बरोबर पण आहे, कारण नरेंद्र मोदी हे स्वयंप्रकाशित नेते आहेत. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी कोणतेही दबावतंत्र वापरले, नाही किंवा त्यांच्याकडे काही आमदार होते, त्याआधारावर त्यांनी तसा दबाव आणला नाही. घराणेशाहीचा प्रश्न नव्हता. घराण्यामधलं कोणी मुख्यमंत्री होतं म्हणून मोदींना गुजरातचे मुख्यमंत्रीपद मिळाले असेही झाले नाही. पंतप्रधान झाले तेव्हाही हीच परिस्थिती होती. पण सरकार बनविण्यासाठी स्वतःच्या चेहऱ्यावर उमेदवार निवडून आणण्याची त्यांची ताकद होती.
आता नरेंद्र मोदींसारख्या स्वयंप्रकाशित नेत्याकडून सोनिया गांधी कशा काय आदर्श घेणार, त्यांच्याकडून काय शिकण्यासारखा आहे असं कसं म्हणणार? त्यापेक्षा मल्लिकार्जुन खरगे किंवा मनमोहन सिंग हे त्यांच्या दृष्टीने यशस्वी कारण ते आपल्या आशीर्वादानुसार ते काम करतात. सोनियांनी खर्गे, मनमोहन सिंग यांची नावे घेताना आपले पुत्र राहुल गांधींचं मात्र नाव घेतलं नाही. राहुल गांधींच्या प्रयत्नांचं तरी त्यांनी कौतुक करायला हवं होतं. राहुल गांधींनी जे काही यश मिळवलेलं आहे आज त्याचा काहीतरी उल्लेख करायला पाहिजे होता. पण तो उल्लेख त्यांनी केलेला नाही. कदाचित राहुल गांधी यशस्वी होणार नाहीत अशी त्यांचीच खात्री असावी. पण राहुल गांधी जे काही करत आहेत, ते मोदींच्या विरोधात असले तरी जे काही ते करतायत ते स्वतःच्या प्रेरणेने करतायत. ते सोनिया गांधींचं ऐकून करतात असं अजिबात वाटत नाही. त्याच्यामुळे नुकसान होतंय, फायदा होतोय कशाचाही विचार न करता ते काहीही करत असतात. ते कधी आंदोलन करतात कधी सर्वोच्च न्यायालयावर ते धावून जातात त्यांना वाटेल ते करतात आणि त्यामुळे सोनिया गांधींना ते यशस्वी वाटत नसावेत.
सोनिया गांधींच्या दृष्टीने यशस्वी कोण तर जे आपल्यासमोर मिंधे होतील, आपल्यासमोर झुकतील, नतमस्तक होतील, आपण सांगू तसं करतील, आपल्या आदेशानुसार चालतील ते सगळे यशस्वी असतात. कदाचित त्या यादीमध्ये आता कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेले डी. के. शिवकुमार किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री असलेले रेवंत रेड्डी ही मंडळी येऊ शकतील. पी. व्ही. नरसिंहरावांचं नाव त्यांनी घेतलं नाही तेही पंतप्रधानच होते. पण ते स्वयं प्रकाशित होते. ते कधी गांधी कुटुंबीयांसमोर झुकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काँग्रेसकडून कशी उपेक्षा झाली हे आपण पाहिलेलं आहे पण तसे डी. के. शिवकुमार किंवा रेवंत रेड्डी यांच्या बाबतीत होणार नाही. राहुल गांधींचं नुकतंच जे आंदोलन दिल्लीत झालं, त्यावेळेला राहुल गांधींनी त्याला मानगूट पकडून बाजूला काढलं. पण डी. के. शिवकुमार काही करू शकले का, त्यांनी याचा निषेध नोंदवला का. कदाचित पुढच्या काळामध्ये ते काँग्रेसमधले सर्वात यशस्वी नेते ठरतील. त्याच आंदोलनात हुड्डा नावाचे काँग्रेसचे हरियाणामधले नेते गाडीवर उभे होते, त्यांना सुद्धा राहुल गांधींनी खाली उतरवलं. नेहा बोरा एका डाव्या विद्यार्थी संघटनेची प्रमुख असून सुद्धा ती मात्र आवर्जून त्या गाडीवर उभी होती.
रेवंत रेड्डी किंवा डी. के. शिवकुमार यांचे अनेक असे व्हिडिओ आलेले आहेत. रेवंत रेड्डी हे एका व्हिडिओमध्ये सोनिया गांधींना रस्ता दाखवताना दिसतात. पण त्याचवेळेला सोनिया गांधींचा सेक्युरिटी असलेला एक माणूस रेवंत रेड्डींना बाजूला ढकलतो. ही अवस्था आहे या नेत्यांची. हिमंता विश्व शर्मांसारख्या नेत्यांचा अपमान राहुल गांधींनी केला पण ते लाचार होऊन पक्षात राहिले नाहीत. तर त्यांनी पक्ष सोडला. आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. असे लोक काँग्रेसला चालत नाहीत त्यांना असेच नतमस्तक होणारे लोक लागतात, पण राहुल गांधी मात्र सोनिया गांधींना यशस्वी का वाटत नाहीत हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राहुल गांधी आंदोलन करत आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी ते झटतायत. भलेही त्यासाठी सगळ्या संस्थांवर भलतेसलते आरोप केले, त्या संस्थांची बदनामी केली, अराजक निर्माण झालं तरी हरकत अशी त्यांची भूमिका आहे तरी देखील राहुल गांधी सोनियांच्या लेखी हे यशस्वी नाहीत नाहीत. त्यापेक्षा मनमोहन सिंग किंवा मल्लिकार्जुन खरगे अशी माणसं अधिक उजवी ठरतात.
