घरराजकारणसंघ,मोदींकडून शिकण्यासारखे काहीच नाही!

संघ,मोदींकडून शिकण्यासारखे काहीच नाही!

सोनिया गांधींनी मुलाखतीत व्यक्त केले मत

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र १० नोव्हेंबरला प्रकाशित होत असून त्यानिमित्ताने त्यांनी द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, नरेंद्र मोदींकडून शिकण्यासारखे काही नाही. उलट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे अधिक यशस्वी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय उदयातून काँग्रेस काय शिकू शकते, असा प्रश्न विचारण्यात आला असता, सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उदाहरणे दिली. काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या मार्गांनी सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेले हे दोन नेते यशस्वी असल्याचे त्यांनी सांगितले. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आम्हाला शिकण्यासारखे फार काही आहे, असे वाटत नसल्याचेही त्या म्हणाल्या.

सोनिया गांधींना गेल्या १२ वर्षांत देशाचे नुकसान झाल्याचे वाटते. त्या म्हणतात की, १२ वर्षात भारताच्या लोकशाही संस्था आणि लोकशाही व्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला. ही व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांना वाटते.

विरोधी पक्षांना निवडणुकीत समान संधी दिली जात नसल्याचेही सोनियांना वाटते. काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन करताना सोनिया गांधी म्हणाल्या, “या हल्ल्यांचा सामना करण्याची आणि त्यांच्याविरोधात ठामपणे उभे राहण्याची क्षमता दाखवणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे.” तसेच समान विचारधारा असलेल्या इतर संघटना आणि गटांसोबत काँग्रेस काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोनिया गांधी यांच्या आठवणींवर आधारित आत्मचरित्रात राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचा त्यांच्या राजकीय जीवनावर झालेला प्रभावही अधोरेखित करण्यात आला आहे. आणीबाणीच्या काळाबाबत भाष्य करताना त्यांनी हा काळ स्वतंत्र भारताच्या इतिहासातील निःसंशयपणे एक काळा अध्याय असल्याचे म्हटले. मात्र, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर केवळ संजय गांधी यांचाच दबाव नव्हता, तर त्यांच्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांचाही दबाव होता, असे सोनिया गांधी यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची माहिती देणाऱ्याला २० दशलक्ष डॉलरचे बक्षीस

पॅरालिम्पिकमध्ये अवनीचा ऐतिहासिक ठसा!

टेक महिंद्राच्या माजी व्यवसाय प्रमुखाची गोळ्या घालून हत्या

त्या म्हणाल्या, “आणीबाणी म्हटले की सर्वसामान्यांच्या मनात संजय गांधी यांचे नाव येते. मात्र, त्यांच्याशिवायही इंदिरा गांधी यांच्यावर मोठा दबाव होता. त्यांच्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांकडूनही दबाव आणला जात होता. अशा परिस्थितीत राजीव गांधी यांच्यासारखे वेगळा दृष्टिकोन मांडणारे लोक त्यांच्या आसपास फार कमी होते, असे मला वाटते.”

आणीबाणीत लोकांच्या अधिकारांवर मर्यादा

आणीबाणीच्या काळात लोकांचे लोकशाही अधिकार मर्यादित करण्यात आले होते आणि बंदी प्रत्यक्षीकरणाचा अधिकारही स्थगित करण्यात आला होता, याची त्यांनी कबुली दिली. आणीबाणी लागू होण्यापूर्वी झालेल्या हिंसक आंदोलनांचा, जाळपोळीचा तसेच नोकरशाही आणि सशस्त्र दलांनी सरकारी आदेशांचे पालन करू नये, अशा आवाहनांचाही त्यांनी उल्लेख केला.

याशिवाय, इंदिरा गांधी यांनी मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणुका जाहीर केल्या होत्या आणि त्यानंतर आणीबाणीच्या काळात झालेल्या अतिरेकांबद्दल सार्वजनिकरीत्या खेद व्यक्त करून माफीही मागितली होती, याची आठवण सोनिया गांधी यांनी करून दिली.

शरद पवारांच्या बंडाचीही आत्मचरित्रात आठवण

सोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडाचाही उल्लेख केला आहे.  आपल्या आत्मचरित्रात या प्रसंगाची आठवण सांगताना सोनिया गांधी यांनी बैठकीतून अश्रू ढाळत बाहेर पडल्याचे नमूद केले आहे.

त्या लिहितात, “मी पद आणि सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात प्रवेश केला नव्हता. याच काही सहकाऱ्यांनी मला राजकारणात येण्याचा आग्रह केला होता आणि आता तेच माझ्याविरोधात उभे ठाकले होते. मला पद गमावण्याचे दुःख नव्हते, तर माझ्या भारताप्रती असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, याचे दुःख होते.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version