दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ च्या बोर्ड परीक्षांच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीच्या लेखी परीक्षेला ८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. विद्यार्थी आता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले वेळापत्रक पाहू शकतील. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा
- बारावी बोर्डाच्या परीक्षा २० जानेवारी २०२७ ते ६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान
- दहावी बोर्डाच्या परीक्षा २८ जानेवारी २०२७ ते १३ फेब्रुवारी २०२७ दरम्यान होणार
हे ही वाचा:
भारतीय हवाई दलाच्या ‘गजराज’ चे १३ हजार फुटांवर लँडिंग
अरुणाचल प्रदेशात ४५८ एकरवरील गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त
कर्नाटकात आलेल्या केरळमच्या बसवर दाऊदचा उदोउदो!
बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारे वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी त्यानुसारच परीक्षेची तयारी करावी. अन्य संकेतस्थळांवरील किंवा समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे डॉ. माळी यांनी नमूद केले. सविस्तर वेळापत्रक http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
