घरदेश दुनियाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बनणार झकास...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बनणार झकास…

जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस'चे लवकरच नुतनीकरण करण्यत येणार आहे. १८८७ साली व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने तेव्हाच्या 'ग्रेट इंडियन पेनिन्सुलार रेल्वे'चे (सध्याची मध्य रेल्वे) मुख्यालय असलेली सध्याची ऐतिहीसिक इमारत बांधण्यात आली. त्यापूर्वी १८५३ मध्ये 'बोरिबंदर' या नावाने तिथे स्टेशन अस्तित्वात होते, जिथून ठाण्याकरिता भारतातील पहिली रेल्वे धावली होती. भारतीय रेल्वेच्या जन्मापासूनचा प्रवास पाहिलेल्या या स्थानकाचे लवकरच नुतनीकरण करण्यात येणार आहे.

मुंबई शहराचा मानबिंदू, ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे लवकरच नुतनीकरण करण्यात येणार आहे. रेल्वेने स्थानक विकासांसाठी स्थापन केलेल्या उपकंपनी ‘इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (आयआरएसडीसी)ने’ यासंबंधीची निवीदा नुकतीच उघडली आहे. त्यातून या कामासाठी १० कंपन्यांनी उत्सुकता दाखवल्याचे कळले आहे.

आयआरएसडीसीने निविदा उघडल्यानंतर १० कंपन्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या नुतनीकरण्याच्या कामासाठी उत्सुकता दाखवली आहे. यात जीएमआर प्राव्हेट लि., आयएसक्यु एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट, कल्पतरू पॉवर ट्रान्स्मिशन लि., ऍन्कोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेन्टस् होल्डिंग्ज लि., अदानी रेल्वेज् ट्रान्सपोर्ट लि., ब्रुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर फन्ड आयव्ही, मॉरिबस होल्डिंग्ज लि., गोदरेज प्रॉपर्टिज् लि., किस्टोन रिऍल्टर प्रा.लि., ओबेरॉय रिएल्टी लि. या कंपन्या रिंगणात उतरल्या आहेत.

आयआरएसडीसी यानंतर प्रत्येक कंपनीची गुणवत्ता छाननी करेल. त्यानंतर पुढील टप्प्यास म्हणजे निवडक कंपन्यांकडून त्यांच्या कामाचा प्रस्ताव मागविण्यात येईल. युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेल्या या इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामाचा एकूण खर्च ₹१,६४२ करोड अंदाजे आहे. तर इमारतीची किंमत ₹१,४३३ करोड आहे.

नुतनीकरणाच्या कामात १९३० नंतरच्या काळात कोणत्याही नियोजनाशिवाय करण्यात आलेले बदल तोडून उत्तम नियोजन करून त्याला अद्ययावत करण्याचे योजले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नुतनीकरणानंतर हे स्थानक विविध तऱ्हेच्या वाहतुकीसाठी एक ठिकाण बनेल. नवी इमारत प्रतिक विक्री केंद्रे, खाद्यपदार्थांची दुकाने आणि विविध वस्तुंची दुकाने इ. सोयी- सुविधांनी युक्त असेल. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version