घरदेश दुनिया...म्हणून अक्षय कुमारने मागीतली चाहत्यांची माफी

…म्हणून अक्षय कुमारने मागीतली चाहत्यांची माफी

खिलाडी कुमार या नावाने प्रसिद्ध असलेला बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने त्याच्या चाहत्यांची माफी मागीतली आहे. चाहत्यांच्या आणि तमाम सिने रसिकांच्या भावना दुखावल्याबद्दल अक्षय कुमारने दिलगिरी व्यक्त केली आहे. याला कारण ठरले आहे अक्षय कुमार याने केलेली एक जाहिरात.

‘विमल’ या गुटखा कंपनीच्या जाहिरातीत नुकताच अक्षय कुमार झळकताना दिसला होता. शाहरूख खान आणि अजय देवगण यांच्यासोबत अक्षय या जाहिरातीत काम करताना दिसला. पण अक्षयला अशी जाहिरात करताना पाहून त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर अक्षय कुमारला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अक्षयला प्रचंड ट्रोलही करण्यात आले. अक्षय कुमार याने काही वर्षांपूर्वी गुटखा, तंबाखू सेवनाच्या विरोधात व्यक्त केलेल्या मतांचे व्हिडिओ पण सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हे ही वाचा:

खंडणी मागणाऱ्या महिलेला मुंडेंनी दिला महागडा मोबाईल आणि ३ लाख

लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद, मंदिर कायदेशीर आहे का हे तपासणार?

दिल्लीत भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

शांतनू गुप्ता लिखित, मल्हार पांडे अनुवादित ‘भाजपा : काल, आज, उद्या’ या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन

या सर्व प्रकारानंतर अक्षय कुमारला त्याची चूक लक्षात आली असून त्याने माफी मागितली आहे. तर भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नसल्याचे आश्वासनही अक्षयने दिले आहे. तर विमलच्या जाहीरातीतून मिळालेला पैसा हा एका चांगल्या सामाजिक कार्याला दान करण्याची घोषणाही अक्षय कुमारने केली आहे. पण असे असले तरी कायदेशीर कराराचे बंधन असल्यामुळे करार संपेपर्यंत विमलची जाहीरात दाखवली जाणार असल्याचे अक्षयने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version