घरदेश दुनियाअहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर?

अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर?

गोपीचंद पडळकर यांच्याकडून मागणी

- Advertisement -

राज्य सरकारनंही अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यात यावं,अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

अहिल्याबाईंनी शस्त्र आणि शास्त्र घेऊन राज्यकारभार केला. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचे जिर्णोद्धार अहिल्यादेवी यांनी केलेला देशाला माहितीच आहे. १२ जोतीर्लिंग घाटबांधणी असे अनेक महत्वाचे विषय अहिल्यादेवी यांच्या हातून झालेले आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात अहिल्यादेवी यांचा पुतळा तयार केला असून जशी केंद्र सरकारनं ही दखल घेतली तशीच दखल राज्य सरकारनंही अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यात यावं,असा तारांकित प्रश्न टाकून गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही

तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार

खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

सरकारच्या वतीनं मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की,सरकार अहिल्यादेवी यांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्याबाबत सकारात्मक आहे. तसा अहवाल आयुक्त अहमदनगर, रेल्वे प्रमुख, पोस्ट खात्याचे प्रमुख यांच्याकडून मागितला आहे.

येत्या काही दिवसांत कॅबिनेटसमोर हा विषय मांडू असे अहिल्यादेवी यांचं नाव किती दिवसात देण्यात येईल या प्रश्नावर विचारलं असता सकारात्मक प्रतिसाद मंत्री दीपक केसरकर यांनी दिला. परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठवू, असं सांगण्यात आल्याचंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.सरकारच्या वतीनं सकारात्मक भूमिका घेतली आहे. अहिल्यादेवींवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या वतीनं सरकारचं अभिनंदन करत असल्याचंही पडळकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version