घरदेश दुनिया‘आमचा संताप गाझाला आता कळेल’

‘आमचा संताप गाझाला आता कळेल’

इस्रायलच्या संरक्षण दलाचा हमासला इशारा

इस्रायलने गाझा पट्टीवर जमिनीवरचा लढा तीव्र केला असताना आता ही लढाई महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. त्यामुळे हमासलाही इस्रायलच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागणार आहे. आपण गाझामधील जमिनीवरील लढा अधिक तीव्र करत आहोत. गाझा पट्टीमधील उत्तर भागात इस्रायलकडून केल्या जाणाऱ्या छाप्यापेक्षा हे हल्ले अधिक मोठे आणि तीव्र असतील, असे शुक्रवारी इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी गाझानेही इस्रायलच्या हल्ल्याला पूर्ण ताकदीनिशी उत्तर दिले जाईल, असे जाहीर केले आहे.

इस्रायलचे सैन्य त्यांच्या रणगाड्यांसह गाझा पट्टीत घुसत असल्याचे एका व्हिडीओत दिसत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गाझा भागातील इंटरनेट आणि फोनसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे २३ लाख नागरिकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने इस्रायलने गुरुवारी घेतलेल्या बैठकीत गाझा पट्टीमध्ये जमिनीवरील लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. हमासने खणलेल्या भुयारांवर आणि अन्य बांधकामांवर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी जोरदार हल्ले केले.

तसेच, गाझा पट्टीमधील पॅलिस्टिनी नागरिकांना त्यांनी दक्षिण भागात स्थलांतरित होण्याचे पुन्हा आवाहन केले. सध्या हमास आणि इस्रायलच्या सैनिकांमध्ये गाझाच्या बेट हनौन आणि अल-बुरैज येथे तीव्र लढाई सुरू आहे. तर, हमासचे अल-कासम ब्रिगेड संपूर्ण ताकदीनिशी लढण्यास आणि इस्रायलच्या आक्रमणाचा सामना करण्यास सज्ज असल्याचे शनिवारी हमासतर्फे जाहीर करण्यात आले.

हे ही वाचा:

गाझामधील युद्धविरामाच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यास भारताचा नकार

मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा जबाब नोंदवला

पूर्वीचे सरकार मोबाईलसारखे हँग; २०१४ नंतर लोकांनी ‘आऊटडेटेड’ मोबाईल सोडले!

युद्धाच्या पार्श्वभूमीवर गाझा पट्टीमधील वीजपुरवठा व इंटरनेटसेवा बंद करण्यात आल्यामुळे येथील पॅलिस्टिनी नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे येत आहेत. ‘वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आमच्या पथकांना वैद्यकीय पथके आणि कार्यालयांपर्यंत पोहोचवण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे तेथील लोकांना रुग्णालये किंवा रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचता येणार नाही,’ अशी भीती पॅलेस्टाइन रेड क्रिसेंट सोसायटी या स्वयंसेवी संस्थेने व्यक्त केली आहे. ही स्वयंसेवी संस्था यासर अराफत यांचे बंधू फाथि अराफत यांच्या निधीतून चालवली जाते. तसेच, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि अन्य स्वयंसेवी संघटनांनीही त्यांच्या मदतपथकाशी कोणताही संपर्क होत नसल्याचे सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version