घरक्राईमनामापंतप्रधान मोदींनी भेट दिलेला देवी कालीचा मुकुट बांगलादेशातील मंदिरातून गेला चोरीला

पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला देवी कालीचा मुकुट बांगलादेशातील मंदिरातून गेला चोरीला

पोलिसांकडून तपास सुरू

बांगलादेशातील सातखीरा येथील जेशोरेश्वरी मंदिरातील देवी कालीचा मुकुट चोरीला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे हा मुकुट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केला होता. गुरुवारी दुपारी पुजारी पूजा करून बाहेर गेल्यावर ही घटना घडली. पुजारी मंदिराबाहेर जाण्याची आणि सफाई कर्मचारी आतमध्ये येण्याची वेळ चोरट्यांनी साधली. ऐन नवरात्रात ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मंदिराचे पुजारी सकाळच्या पूजेनंतर दुपारी निघून गेल्यानंतर काही वेळातच चांदी, सोन्याने मढवलेला मुकुट चोरीला गेला. सफाई कर्मचाऱ्यांना नंतर मूर्तीच्या डोक्यावरील मुकुट गायब असल्याचे आढळून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर गेलेले असताना हा सोन्या-चांदीचा मुकुट जेशोरेश्वरी देवीला अर्पण केला होता.

पुजारी दिलीप मुखर्जी सांगितले की, ते दिवसभर पूजा करून दुपारी दोनच्या सुमारास मंदिराबाहेर पडले. यानंतर काही वेळाने स्वच्छता कर्मचारी साफसफाई करण्यासाठी आले. त्यांनी देवीकडे पाहिले असता तिच्या डोक्यावरील मुकुट गायब झालेला त्यांना दिसला. मुकुट चांदीचा होता तर त्यावर सोन्याचा मुलामा चढविण्यात आला होता. यानंतर त्यांनी तातडीने ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर इन्स्पेक्टर तैजुल इस्लाम यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे असून आरोपीला शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

इस्रायलकडून मध्य बेरूतमध्ये हवाई हल्ला; २२ ठार

‘दुर्मिळ रत्न हरपले’

‘रतन टाटा….एक युग संपले’

‘रतन टाटा यांना आयुष्यभर देशाचाच विचार’

जेशोरेश्वरी मंदिर हिंदू धर्माच्या शक्तिपीठांपैकी एक आहे. हे मंदिर १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात अनारी नावाच्या ब्राह्मणाने बांधले असल्याचे मानले जाते. त्यांनी जशोरेश्वरी पीठासाठी १०० दरवाजे असलेले मंदिर बांधले. नंतर १३ व्या शतकात लक्ष्मण सेनने त्याचा जीर्णोद्धार केला आणि अखेरीस, राजा प्रतापादित्याने १६ व्या शतकात मंदिराची पुनर्बांधणी केली. या ठिकाणी देवी सतीचे हात आणि पायाचे तळवे पडले होते असे सांगितले जाते. येथे जशोरेश्वरीचा वास असून भगवान शंकर चंद्राच्या रुपात तिथे प्रकट होतात, अशी मान्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version