घरदेश दुनियादोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम; इस्रायल- हमास शांततेसाठी सहमत

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम; इस्रायल- हमास शांततेसाठी सहमत

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती

- Advertisement -

इस्रायल आणि दहशतवादी संघटना असलेल्या हमास यांच्यात गेली दोन वर्षे युद्ध सुरू आहे. गाझा पट्टीत सुरू झालेले युद्ध रोखण्यासाठी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता प्रस्ताव सादर केला होता. अखेर गाझामधील लढाई थांबवण्यासाठी शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल आणि हमास सहमत झाले आहेत, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याला दोन वर्षे झालेली असताना याच्या एक दिवसानंतर हा करार झाला.

ट्रम्प यांनी लिहिले आहे की, “मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की इस्रायल आणि हमास दोघांनीही शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर स्वाक्षरी केली आहे. याचा अर्थ असा की लवकरच सर्व बंधकांना सोडण्यात येईल आणि इस्रायल त्यांचे सैन्य एका मान्य रेषेवर माघारी घेईल जे मजबूत, टिकाऊ आणि शाश्वत शांततेच्या दिशेने पहिले पाऊल आहे. सर्व पक्षांना न्याय्य वागणूक दिली जाईल! हा अरब आणि मुस्लिम जगत, इस्रायल, आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांसाठी आणि अमेरिकेसाठी एक महान दिवस आहे. कतार, इजिप्त आणि तुर्कीमधील मध्यस्थांचे आभार मानतो, ज्यांनी ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व घटना घडवून आणण्यासाठी आमच्यासोबत काम केले.”

गाझा शांतता कराराच्या सुरुवातीच्या टप्प्याला इस्रायली अधिकारी, हमास आणि मध्यस्थ कतार यांनी पुष्टी दिली. एका निवेदनात, हमासने म्हटले आहे की त्यांनी गाझामधील युद्ध संपवण्यासाठी एक करार केला आहे, ज्यामध्ये इस्रायलींनी माघार घेणे आणि ओलिस-कैदींची देवाणघेवाण करणे समाविष्ट आहे. तसेच इस्रायल युद्धबंदीची पूर्णपणे अंमलबजावणी करेल याची खात्री करण्याचे आवाहन हमासने ट्रम्प आणि हमीदार देशांना केले.

कराराच्या अंमलबजावणीनंतर ७२ तासांच्या आत ओलिस आणि पॅलेस्टिनी कैद्यांची देवाणघेवाण होईल, ज्यामध्ये सर्व जिवंत ओलिसांची अदलाबदल जवळजवळ २००० पॅलेस्टिनी कैद्यांसाठी केली जाईल. हमासने या आठवड्याच्या शेवटी सर्व २० जिवंत ओलिसांना सोडण्याची योजना आखली आहे.

हे ही वाचा:

कोल्ड्रिफ सिरप बनवणाऱ्या स्रेसन फार्माच्या मालकाला अटक

दिवाळीपूर्वी पोलिसांची नागरिकांना भेटवस्तू

गुंतवणुकीच्या नावाखाली ३.२६ कोटींची फसवणूक

अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांमुळे तरुणांना प्रगतीची सुवर्णसंधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी!

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या घोषणेचे स्वागत केले आणि हा इस्रायलसाठी एक महान दिवस असे वर्णन केले. सर्व प्रिय ओलिसांना घरी आणण्यासाठी सरकारची बैठक बोलावणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच इस्रायलच्या सुरक्षा दलांचे आणि ट्रम्प यांचे त्यांनी करारात मध्यस्थी केल्याबद्दल आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version