घरविशेषप्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’ची २५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’ची २५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

आगाऊ बुकिंगमधून ९६.५६ कोटींची कमाई

बहुप्रतीक्षित ‘रामायण : पार्ट वन’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. अभिनेता रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने आगाऊ बुकिंगमधून तब्बल ९६.५६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच २५.६५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच १०० कोटींचा टप्पा गाठण्याच्या जवळ हा चित्रपट पोहोचला आहे. ५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांच्या आगाऊ बुकिंगमधून ९६.५६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यात चित्रपटगृहांनी राखून ठेवलेल्या (ब्लॉक केलेल्या) तिकिटांचाही समावेश आहे. ही तिकिटे वगळल्यास कमाई ७७.३१ कोटी रुपये होते. या पाच दिवसांत एकूण ८३ हजारांहून अधिक शोसाठी तिकिटांची विक्री झाली आहे.

पहिल्या दिवसाच्या बुकिंगला सर्वाधिक प्रतिसाद

५ नोव्हेंबरच्या पहिल्या दिवसासाठी सर्वाधिक ३९.३५ कोटी रुपयांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. त्यानंतर शनिवार, ७ नोव्हेंबरसाठी १९.६८ कोटी, शुक्रवारसाठी १८.५३ कोटी आणि रविवारसाठी १३.२३ कोटी रुपयांचे बुकिंग झाले आहे. सोमवारी ९ नोव्हेंबरसाठी आतापर्यंत ५.७८ कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत.

हे ही वाचा:

अतिक्रमण हटवण्यात कुचराई केल्याबद्दल पालिका आयुक्तांचा पगार रोखणार

सोनम वांगचुक यांच्या शाळेचे कामकाज थांबवण्याचे आदेश

आधी राहुल गांधींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा!

रशियाचा युक्रेनच्या शाळेवर दुहेरी हवाई हल्ला; २४ ठार

चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगमध्ये हिंदी आवृत्तीचा सर्वाधिक वाटा आहे. रविवारच्या बुकिंगमध्ये हिंदी आवृत्तीने १०.७८ कोटी रुपयांची कमाई केली. तेलुगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम आवृत्त्यांनाही प्रतिसाद मिळत आहे. शहरांमध्ये मुंबईने रविवारच्या आगाऊ बुकिंगमध्ये १.८६ कोटी रुपयांसह आघाडी घेतली. त्यानंतर दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरूचा क्रमांक लागतो. नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीतेच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सनी देओल आणि रवी दुबे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version