घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषण२०२९ साठी मोदींसाठी राहुल गांधी यांचे रेड कार्पेट...

२०२९ साठी मोदींसाठी राहुल गांधी यांचे रेड कार्पेट…

इंडिया आघाडीची रामलीला मैदानातील रॅली फ्लॉप शो ठरली, परंतु या आघाडीचे नेतृत्व मात्र आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे चालत आलेले आहे. तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही आता अपवाद उरलेला नाही. ममता आणि राहुल यांच्यात इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून जे शीतयुद्ध होते, ते शमले असल्याचे चित्र रामलीला मैदानावर दिसले. ममता यांनी माघार घेतली आहे. राहुल गांधी हेच आता इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील. हे काँग्रेसपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जास्त पथ्यावर पडणार आहे. रामलीला मैदानावरील सभेने मोदी यांच्यासाठी २०२९ च्या लोकसभा निवडणुकांचे मैदान साफ केले आहे. रामलीला मैदानात झालेल्या इंडिया आघाडीच्या रॅलीचे उद्दिष्ट स्पष्ट होते. हे काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन होते. या सभेच्या निमित्ताने विरोधकांना केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात संघर्षाची ठिणगी टाकायची होती. देशातील जनता मोदी सरकारच्या विरोधात उभी ठाकली आहे, असे चित्र निर्माण करायचे होते. भारतात अराजकपर्वाची सुरुवात करायची होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणायचा होता. सभा फ्लॉप झाल्यामुळे हे सगळे मनोरे कोसळले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version