घरदेश दुनियाइस्रायल-हमास युद्धबंदी करार: युद्धबंदीच्या निरीक्षणासाठी अमेरिकन सैन्य तेल अवीवमध्ये दाखल !

इस्रायल-हमास युद्धबंदी करार: युद्धबंदीच्या निरीक्षणासाठी अमेरिकन सैन्य तेल अवीवमध्ये दाखल !

विस्थापित गाझावासीय घरी परतले

गाझा युद्धविराम कराराची अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी मदत करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून अमेरिकन सैन्य रात्रीपासून इस्रायलमध्ये पोहोचू लागले, असे एका सूत्राने एबीसी न्यूजला सांगितले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख अ‍ॅडमिरल ब्रॅड कूपर गुरुवारी इस्रायलमध्ये पोहोचले. अहवालानुसार, २०० सदस्यांची ही टीम आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि मध्य पूर्वेतील इतर तळांवरून प्रवास करून येणार आहे. या पथकाचे उद्दिष्ट संयुक्त नियंत्रण केंद्राची स्थापना, गाझामध्ये प्रवेश करणाऱ्या सुरक्षा दलांमधील समन्वय, तसेच इस्रायली लष्कराशी थेट संपर्क ठेवणे आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, यूएस सेंट्रल कमांड इस्रायलमध्ये “नागरी-लष्करी समन्वय केंद्र” स्थापन करेल जे मानवतावादी मदत पोहोचवण्यास मदत करेल, तसेच दोन वर्षांच्या संघर्षामुळे उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशाला लॉजिस्टिक आणि सुरक्षा सहाय्य प्रदान करेल, असे एपीने उद्धृत केले आहे.

गाझामध्ये अमेरिकन सैन्य नाही जाणार

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, गाझामध्ये प्रत्यक्ष अमेरिकन सैन्य पाठवण्याची कोणतीही योजना नाही. हे पथक इजिप्तमध्ये कार्यरत राहील, आणि त्यात इजिप्त, कतार, तुर्की आणि कदाचित यूएईचे सैन्य अधिकारीही सहभागी असतील.

इस्रायली सैन्याने युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्यात माघार घेतल्यानंतर, शुक्रवारी हजारो विस्थापित पॅलेस्टिनी नागरिक पायी चालत गाझामधील आपल्या उद्ध्वस्त घरांकडे परतू लागले. उत्तरेकडे, गाझा शहराच्या दिशेने जाणाऱ्या लोकांनी इस्रायली ड्रोनच्या देखरेखीखाली तासनतास चालत गेल्याचे सांगितले. काहींनी अजूनही स्फोटांचे आवाज ऐकले, तर काहींनी ड्रोनने गोळीबार केल्याचेही म्हटले.

हे ही वाचा :

आदिवासी गल्लीपासून एशियन गोल्डपर्यंत

भारतचा ‘डॉन ब्रॅडमन’

टीम इंडियाची पहिली डाव ५१८/५ वर घोषित!

मुफलिसीच्या गल्लीपासून टीम इंडियापर्यंत — रिंकू सिंहची कहाणी ‘दिल से’!

इस्माईल झायदा, गाझा शहरातील रहिवासी म्हणाले, “देवाचे आभार, माझं घर अजूनही उभं आहे. पण सगळा परिसर उद्ध्वस्त झालाय. माझ्या शेजाऱ्यांची घरं पूर्णपणे नष्ट झाली आहेत.” इस्रायली सैन्याच्या माघारीनंतर, पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी गाझामधून १०० मृतदेह बाहेर काढल्याची माहिती दिली आहे. वैद्यकीय पथकांनी नष्ट झालेल्या घरांमध्ये जाऊन ही मृतदेह बाहेर काढली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version