घरदेश दुनियाऑपरेशन सिंदूर दरम्यान मसूद अझहरचे कुटुंब उध्वस्त!

ऑपरेशन सिंदूर दरम्यान मसूद अझहरचे कुटुंब उध्वस्त!

जैशचा कमांडर मसूद इलियासची कबुली

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पहिल्यांदाच कबूल केले आहे की, त्यांचा प्रमुख मसूद अझहरचे कुटुंबीय हे भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या हल्ल्यात मारले गेले. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, जैशचा एक टॉप कमांडर, मसूद इलियास काश्मिरी हा या माहितीची कबुली देत असल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६- ७ मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूर राबवले. तेव्हा सांगितले जात होते की, मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब आणि इतर दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले आहेत. भारताच्या या दाव्याला आता जैश-ए-मोहम्मदने पुष्टी केली आहे. मसूद इलियास काश्मिरी हा जैश-ए-मोहम्मदचा कमांडर असून मसूद अझहरचा निकटवर्तीय म्हणून त्याची ओळख आहे. व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात उभा राहून काश्मिरी भाषण करत आहे. तसेच तो भारताच्या हल्ल्यात दहशतवादी संघटनेच्या झालेल्या नुकसानाची कबुली देताना दिसत आहे. ७ मे रोजी बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाह या जैशच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात अझहरच्या कुटुंबाचे तुकडे तुकडे झाले होते, असे काश्मिरी म्हणत आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान तसेच पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करत हल्ले केले. यावेळी मसूद अझहरचे नातेवाईक ठार झाले होते. त्यात त्याची बहीण, तिचा पती, पुतण्या, भाची आणि कुटुंबातील मुले यांचा समावेश होता. पाकिस्तानने हे मान्य केले नाही, परंतु आता जैश कडूनचं यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हेही वाचा..

‘साधेपणाला प्राधान्य देणारे नेते आहेत पंतप्रधान मोदी’

मुंबई क्राईम ब्रांचने केला दरोड्याचा पर्दाफाश

मत्स्यासन : पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त

जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना द्यावा

संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेला दहशतवादी अझहर हा भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आहे. यामध्ये २०१६ चा पठाणकोट हल्ला आणि २०१९ चा पुलवामा हल्ला यांचा समावेश आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, अझहर हा शेवटचा पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट- बाल्टिस्तान प्रदेशात दिसला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version