घरदेश दुनियाकधी कल्पनाही केली नव्हती; लोकआशीर्वादाने पंतप्रधानपदी पोहोचलो!

कधी कल्पनाही केली नव्हती; लोकआशीर्वादाने पंतप्रधानपदी पोहोचलो!

उत्तराखंड भूमीशी माझे नाते मर्माचे पण आहे आणि कर्माचेही. सत्त्वाचेही आहे आणि तत्वाचेही. २० वर्षांपूर्वी जनतेची सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सोपविण्यात आली. पण पंतप्रधानपदी पोहोचेन याची मी कधी कल्पनाही केली नव्हती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ते पंतप्रधानपद या २० वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगितले.

उत्तराखंड येथे ऑक्सिजन प्लँट्सच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान मोदी बोलत होते.

ते म्हणाले की, हादेखील एक संयोग आहे की, उत्तराखंडची निर्मिती २०००मध्ये झाली आणि त्यानंतर काही महिन्यात २००१मध्ये माझी कारकीर्द सुरू झाली. सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि लोकांच्या आशीर्वादाने पंतप्रधान म्हणून पोहोचणे मी कधीही याची कल्पना केली नव्हती. २० वर्षांच्या या अखंड यात्रेला आता २१ व्या वर्षात प्रवेश करत आहे. या महत्त्वपूर्ण वर्षात ज्या धरतीने मला निरंतर स्नेह दिला, तिथे येणे हे माझ्या दृष्टीने गौरवास्पद आहे. तप आणि त्यागाचा मार्ग दाखविणारी ही भूमी आहे. या भूमीवर आल्यामुळे कोटी कोटी देशवासियांच्या सेवेचा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे, मजबूत झाला आहे.

 

हे ही वाचा:

पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!

मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या

देशभर सुरु आदिशक्तीचा जागर

…आणि असा घातला त्याने मित्रालाच गंडा

 

इथे आल्यावर एक नवी ऊर्जा मला मिळते. योग आणि आयुर्वेद यांच्या शक्तीने ज्या क्षेत्राने जीवनाला आरोग्य बनविण्याचे समाधान दिले, तिथूनच आज देशभरात अनेक ऑक्सिजन प्लँट्सचे लोकार्पण झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version