घरदेश दुनियापाकिस्तानच्या 'खांद्यावर अणुबॉम्ब' ठेवत इराणची इस्रायलला धमकी!

पाकिस्तानच्या ‘खांद्यावर अणुबॉम्ब’ ठेवत इराणची इस्रायलला धमकी!

इराणच्या जनरलचा दावा पाक मंत्र्याने फेटाळला

दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला करणे हा मराठीत वाकप्रचार आहे. सध्या इराणने इस्रायलशी सुरू असलेल्या युद्धात पाकिस्तानचा खांदा वापरायचे ठरवले आहे. पाकिस्तानला अर्थातच त्याची खबर नाही. इस्रायलने जर इराणवर अणुबॉम्ब टाकला तर पाकिस्तानही इस्रायलवर अणुहल्ला करेल असे इराण सांगत आहे.

“पाकिस्तानने आम्हाला सांगितले आहे की जर इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब वापरला तर पाकिस्तानही इस्रायलवर अणुबॉम्ब हल्ला करेल,” असे आयआरजीसी कमांडर आणि इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य जनरल मोहसेन रझाई यांनी इराणी सरकारी टेलिव्हिजनवर सांगितले. तथापि, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आणि म्हटले की इस्लामाबादने अशी कोणतीही वचनबद्धता केलेली नाही.

इस्लामाबादने अणुहल्ल्याची कोणतीही चर्चा नाकारली असली तरी, इस्रायलसोबतच्या व्यापक संघर्षात इराणला उघड पाठिंबा दर्शविला आहे. तेहरानवरील हल्ल्यानंतर, पाकिस्तानने “इराणच्या मागे उभे राहण्याची” प्रतिज्ञा केली होती आणि ज्यू देश असलेल्या इस्रायलविरुद्ध मुस्लिम ऐक्याचे आवाहन केले होते.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान

अर्कमूळ : अनेक समस्यांवर करते उपचार

मुंबईतील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

१९८० नंतर रुमेटॉइड आर्थरायटीसच्या प्रकरणांमध्ये का वाढ होतेय…

१४ जून रोजी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी राष्ट्रीय सभेत सांगितले की, मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलविरुद्ध एकत्र यावे अन्यथा इराण आणि पॅलेस्टाईनसारखी परिस्थिती निर्माण होईल. तुर्किए टुडेच्या बातमीनुसार, पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “इस्रायलने इराण, येमेन आणि पॅलेस्टाईनला लक्ष्य केले आहे. जर मुस्लिम राष्ट्रे आता एकत्र आली नाहीत तर प्रत्येकाला त्याच नशिबाला सामोरे जावे लागेल.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version