घरदेश दुनियाट्रम्प नरम, इराण मात्र गरम !

ट्रम्प नरम, इराण मात्र गरम !

अमेरिकेचे माघारीचे संकेत, इराण म्हणतो, आमच्यापुढे नमले

मध्यपूर्वेतील संघर्षात आता अमेरिकेकडून काही प्रमाणात नरमाईचे संकेत दिसू लागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर नियोजित हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या “सकारात्मक आणि फलदायी” चर्चांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, इराणने हे अमान्य करत हा निर्णय इराणच्या “कडक इशाऱ्यामुळे अमेरिकेला माघार घ्यावी लागल्याचा आहे, असे म्हटले आहे.

ट्रम्प यांची घोषणा

ट्रूथ सोशल वरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या युद्ध विभागाला त्यांनी आदेश दिले आहेत की, इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित ठेवावेत. त्यांनी स्पष्ट केले की, गेल्या दोन दिवसांत दोन्ही देशांमध्ये सखोल, तपशीलवार आणि सकारात्मक चर्चा झाल्या असून त्या पुढील आठवडाभर सुरू राहणार आहेत. या चर्चांच्या यशावरच पुढील निर्णय अवलंबून असेल.

इराणची प्रतिक्रिया: “अमेरिकेची माघार”

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काबुलमधील इराणी दूतावासाने तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की, हा निर्णय इराणच्या ठाम इशाऱ्यामुळे घेतलेली अमेरिकेची माघार आहे. त्यांनी म्हटले की, जर अमेरिकेने इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला केला असता, तर संपूर्ण प्रदेशातील ऊर्जा प्रकल्प लक्ष्य केले गेले असते.

तणाव कमी होण्याचे संकेत?

ही घडामोड अशा वेळी घडली आहे, जेव्हा एक दिवस आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ४८ तासांत हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांना “उद्ध्वस्त” करण्याची धमकी दिली होती. इराणनेही कठोर भूमिका घेत इशारा दिला होता की, कोणताही हल्ला झाल्यास संपूर्ण प्रदेशात प्रत्युत्तर दिले जाईल. इराणी संसद अध्यक्ष मोहम्मद बाकर कलिबाफ यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत महत्त्वाच्या सुविधांचे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. तसेच इस्लामिक रिव्होल्युशनीर गार्ड कॉर्प्स (IRGC) नेही अमेरिकन तळ असलेल्या देशांतील ऊर्जा प्रकल्प लक्ष्य करण्याचा इशारा दिला.

होर्मुझ सामुद्रधुनी आणि जागतिक परिणाम

हॉर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील अत्यंत महत्त्वाची तेल वाहतूक मार्गिका आहे. २८ फेब्रुवारीपासून इराणने येथे वाहतूक थांबवल्यामुळे जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. ब्रेंट क्रूड तेलाचा दर ११० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला होता, तर रविवारी तो ११९ डॉलरपर्यंत गेला.

मात्र, ट्रम्प यांच्या घोषणेनंतर तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूडमध्ये सुमारे १३ टक्क्यांची घसरण झाली आणि तो सुमारे १०४ डॉलर प्रति बॅरलवर आला. याचवेळी जागतिक शेअर आणि बाँड बाजारात वाढ दिसून आली.

हे ही वाचा:

मध्यपूर्वेतील तणाव वाढल्याने शेअर बाजार कोलमडला

‘इराणने इस्रायलच्या नागरिकांच्या सामुहिक हत्येचा प्रयत्न केला’

ChatGPT च्या वापरकर्त्यांना दिसणार जाहिराती

… म्हणून इराणने क्षेपणास्त्रांवर लावला स्पॅनिश पंतप्रधानांचा फोटो

प्रत्यक्ष परिस्थिती अजूनही गंभीर

राजनैतिक हालचाली सुरू असल्या तरी जमिनीवरील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही इस्रायलने तेहरानमध्ये हल्ले सुरूच ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडच्या काळात इराणवर अमेरिकन-इस्रायली हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, विशेषतः हॉर्मुझ परिसरात. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.

इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने 400 पेक्षा अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली असून, त्यापैकी बहुतेक हवाई संरक्षण यंत्रणांनी अडवली आहेत.

मानवी हानी वाढतेय

या संघर्षाचा मानवी परिणामही गंभीर आहे. इराणच्या रेड क्रेसेंटनुसार ८१ हजारहून अधिक घरे आणि इमारतींचे नुकसान झाले आहे. तर इस्रायलमध्ये २७०० हून अधिक लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. या संघर्षाचा परिणाम इतर देशांवरही झाला आहे.संयुक्त अरब अमिराती, कुवेत, सौदी अरेबिया, कतार येथे अमेरिकन तळांवर इराणने हल्ले केले आहेत.

तसेच इराणसमर्थित हिजबुल्लाने तेल अविववर रॉकेट हल्ले केल्याने इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version