घरदेश दुनियाअमेरिकेला खामेनी कुठे लपलेत माहिती आहे, पण आत्ताच मारणार नाही!

अमेरिकेला खामेनी कुठे लपलेत माहिती आहे, पण आत्ताच मारणार नाही!

डोनाल्ड ट्रम्प यांचा खामेनी यांना इशारा देत 'बिनशर्त आत्मसमर्पणा'चे आवाहन 

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक इशारा दिला आहे. सोशल मीडियावर जाहीर केले आहे की अमेरिकेला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे नेमके स्थान माहित आहे. मात्र, त्यांना आत्ताच बाहेर काढणार. पण अमेरिकेचा संयम ढासळत चालला असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटले, “आम्हाला माहित आहे की तथाकथित ‘सर्वोच्च नेता’ कुठे लपला आहे. तो एक सोपा लक्ष्य आहे, पण तिथे सुरक्षित आहे – आम्ही त्याला बाहेर काढणार नाही (मारणार नाही!), किमान सध्या तरी नाही. परंतु क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकन नागरिक किंवा सैनिकांचे नुकसान होऊ नये असे आम्हाला वाटते. आमचा संयम संपत चालला आहे. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!”  त्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट केली आणि सर्व कॅपिटल अक्षरांमध्ये लिहिले, “बिनशर्त आत्मसमर्पण!”

इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जग चिंतेत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे हे विधान आले आहे. इस्रायल-इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात इराणमध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्रीही हा हल्ला सुरूच राहिला, इस्रायली लष्कराने दावा केला की इस्रायली सैन्याने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.

हे ही वाचा : 

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार!

देशातील पहिला रेडिओ महोत्सव मुंबईत, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश!

भारतातून इराणला होणारी तांदळाची निर्यात थांबली, सुक्या मेव्याचे दरही वाढले!

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली आणि म्हटले की, ‘आम्ही युद्धबंदीपेक्षा चांगले काहीतरी शोधत आहोत’. याचा अर्थ काय आहे याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, “खरा शेवट. युद्धबंदी नाही. शेवट! दरम्यान, ट्रम्प यांनी संभाव्य राजनैतिक सहभागाचे संकेत देत म्हटले आहे की ते तेहरानशी संपर्क साधण्यासाठी उपाध्यक्ष जेडी व्हान्स किंवा मध्य पूर्व राजदूत स्टीव्ह विटकॉफ सारख्या उच्च अधिकाऱ्यांना “पाठवू शकतात”, असे वृत्तसंस्था रॉयटर्सने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version