घरदेश दुनियायुक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी तात्काळ युद्धविराम करण्याचे केले आवाहन!

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी तात्काळ युद्धविराम करण्याचे केले आवाहन!

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी युक्रेनच्या पूर्व भागात तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे, जेथे अलिकडच्या दिवसांत रशियन समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनियन सैन्य यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

त्यांनी असेही सांगितले की युक्रेन त्रिपक्षीय संपर्क गटातील शांतता चर्चेस समर्थन करत आहे. “आम्ही शांततेच्या मार्गाने जाण्यास तयार आहोत त्यामुळे आम्ही TCG च्या तात्काळ बोलावण्याला आणि शांततेची व्यवस्था तात्काळ लागू करण्यास समर्थन देतो,” असे झेलेन्स्की ट्विटरवर म्हणाले आहेत. यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि रशियाचे नेते व्लादिमीर पुतिन यांनीही पूर्व युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी काम करण्यास सहमती दर्शवली आहे.

पूर्व युक्रेनमधील सैनिक आणि रशिया-समर्थित फुटीरतावादी यांच्यातील संपर्क रेषेवर दोन दिवस सतत गोळीबार चालू होता. रविवारी रशियन सैन्याची एक मोठी तुकडी बेलारूसमध्ये आणली गेली आहे. रशियन सैन्याच्या उपस्थितीमुळे युक्रेनची चिंता वाढली आहे. रशियन त्या सैन्यांचा वापर युक्रेनची राजधानी, कीव येथे हल्ला करण्यासाठी तैनात करू शकते. कीवची लोकसंख्या सुमारे तीन दशलक्ष आहे. यामुळे युक्रेनच्या अध्यक्षांनी युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे.

अनेक पाश्चात्य नेत्यांनी चेतावणी दिली की, रशिया हल्ला करण्यास तयार आहे, जे सुमारे एक लाख ५० हजार रशियन सैनिक, युद्ध विमाने आणि उपकरणे यांनी तीन बाजूंनी युक्रेनला वेढलेले आहे. रशियाने शनिवारी आण्विक कवायती तसेच बेलारूसमध्ये पारंपारिक सराव आयोजित केला होता आणि काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर नौदल कवायती सुरू आहेत.तसेच बेलारूसमध्ये तीस हजार रशियन सैन्य असल्याचा अंदाज नाटोने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

मिठागराच्या जमिनीवर सेना आमदार उभारणार थीम पार्क?

तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?

ठाकरे-राव भेट! तिसऱ्या आघडीच्या उचक्या पुन्हा सुरु

लोकपालची मागणी करणारे केजरीवाल लोकायुक्त नियुक्त करत नाहीत

युनायटेड स्टेट्स आणि अनेक युरोपीय देशांनी अनेक महिन्यांपासून रशियावर आक्रमण करण्याचे बहाणे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने केला आहे. दरम्यान,रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्यामुळे, युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडण्याचे आदेश भारतीय दूतावासाने दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version