घरराजकारणराज ठाकरेंएवढ्या कोलांट्या शरद पवारांनीही मारल्या नव्हत्या

राज ठाकरेंएवढ्या कोलांट्या शरद पवारांनीही मारल्या नव्हत्या

अतुल भातखळकरांचा खोचक टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक डॉक्युमेंट्री एक्सवर पोस्ट केली. शिवाय पुढे छोटा काळ असा येईल जिथे देशाला पंतप्रधानच नसतील, असे विधान केले होते. त्यावर बोलताना एवढ्या कोलांट्या शरद पवारांनीही मारल्या नाहीत, अशी तिखट प्रतिक्रिया भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिलेली आहे.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर आधारित ‘द फ्रेंडशिप फाइल्स’ या डॉक्युमेंट्रीची लिंक समाजमाध्यमांवर शेअर करत ही डॉक्युमेंट्री सरकारकडून सोशल मीडियावरून हटवली जाऊ शकते, असा दावा करत राज ठाकरे यांनी ती गायब होण्याआधी पाहून घेण्याचे आवाहन केले.

आमदार अतुल भातखळकर यांनी राज ठाकरेंच्या जुन्या भूमिकेची आठवण करून देत त्यांना लक्ष्य केले. “मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून बरेच प्रश्न पडतायत. २०११ मध्ये त्यांनी गुजरातचा दौरा केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला होता. हे सगळे प्रश्न त्यावेळी सुचले नव्हते?” असा सवाल त्यांनी केला.

इतकेच नव्हे, तर अलीकडेच उद्योगपती गौतम अदानी हे ठाकरे यांच्या घरी आले होते, याची आठवणही भातखळकर यांनी करून दिली. “अलीकडेच गौतम अदानी ठाकरेंच्या घरी आले होते. त्यावेळी तरी या प्रश्नांची उत्तरे विचारून घ्यायची. एवढ्या कोलांट्या तर शरद पवार यांनीसुद्धा मारल्या नव्हत्या,” अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. राज ठाकरेंच्या भूमिकेतील बदलावर बोट ठेवत अतुल भातखळकर यांनी ही टीका केली.

हे ही वाचा:

जगातील तिसऱ्या सर्वाधिक प्रदूषित शहराच्या स्थानी मुंबई

सौदीतील विमानतळावरील हल्ल्यात भारतीयासह दोघांचा मृत्यू

भारत-पोलंड व्यापार १० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य

शीतल-तोमरची सुवर्णवेधक कामगिरी

‘द फ्रेंडशिप फाइल्स’ या डॉक्युमेंट्रीमध्ये नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधांचा प्रवास मांडण्यात आल्याची माहिती आहे. २००३ पासून दोघांमधील जवळीक वाढल्याचा संदर्भ त्यात असल्याचे सांगितले जाते. गुजरातमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अदानी यांनी नरेंद्र मोदी यांना कशी साथ दिली, याबाबतही माहिती असल्याचे वृत्त आहे. याशिवाय, अदानी समूहाला गुजरातमध्ये सुमारे १५ हजार एकर जमीन अत्यंत कमी दराने देण्यात आल्याचा दावा डॉक्युमेंट्रीत करण्यात आला आहे. या जमिनीच्या दरांची तुलना टाटा नॅनो प्रकल्प आणि फोर्ड कंपनीच्या प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या दरांशी करण्यात आली आहे. २०१४ मधील विमानप्रवासाचाही डॉक्युमेंट्रीत उल्लेख आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी गुजरातहून दिल्लीला ज्या विमानाने गेले, ते विमान गौतम अदानी यांचे होते, असा दावाही त्यात करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version