घरक्राईमनामामहापौर, अमिताभ, दिलजित दोसांजसह शाळांना बॉम्बची धमकी

महापौर, अमिताभ, दिलजित दोसांजसह शाळांना बॉम्बची धमकी

सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, धमकीच्या ई-मेलची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ई-मेल कोणी पाठवला आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे, याचा तपास सुरू आहे.

संबंधित ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी एका शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याची, तर २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांचा उल्लेख करण्यात आल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांसह संबंधित सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

यासोबतच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील निवासस्थान ‘जलसा’ बंगलाही उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ग्रेनेडने स्फोट घडवून आणण्याचा यात उल्लेख आहे. तसेच पंजाबी गायक दिलजीत दोसांज याच्या कॉन्सर्टला धमकी मिळाली आहे. यामुळे आयोजक आणि चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

धमकीच्या ई-मेलची गंभीर दखल घेत तो कोणी पाठवला, कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे, याचा तपास सुरू आहे. ई-मेलमधील दावे खरे आहेत की नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, याची पडताळणी तपास यंत्रणांकडून केली जात आहे. महापौर कार्यालयासह ई-मेलमध्ये उल्लेख केलेल्या संभाव्य लक्ष्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे.

हे ही वाचा:

म्यानमारमधील शस्त्र प्रशिक्षण प्रकरणी मॅथ्यू व्हॅनडाइक भारतात परतला

तिघांच्या हत्येप्रकरणी दहशतवाद्याला दुहेरी जन्मठेप

हवामान संकटाला विकसित देश जबाबदार

अरुणाचलच्या सीमेवर चीनसोबत सीमावर्ती संघर्ष कायम

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला यापूर्वीही बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाले होते. या धमक्यांमध्ये महापौरांचे कार्यालय आणि अधिकृत वाहनाला लक्ष्य करण्याचा उल्लेख होता. तसेच मुंबईतील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचाही धमकीच्या संदेशांमध्ये उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर महापालिका मुख्यालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version