घरराजकारणदिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर

दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर

तुरुंगात पाय घसरून पडल्यामुळे रुग्णालयात दाखल

भ्रष्टाचाराच्या आरोपात तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. जैन यांना दिनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. यापूर्वी देखील कारागृहातील बाथरूमध्ये घसरून पडल्यामुळे जैन यांच्या मणक्याला दुखापत झाली होती.

मनी लाँड्रिंग सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. कारागृहात जैन यांचे ३५ किलो वजन घटल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयातील सुनावणीत केला होता. सोमवारी त्यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे मणक्याच्या आजाराबद्दल ओपीडीमध्ये सल्लामसलत केल्यानंतर त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात नेण्यात आले.

हे ही वाचा:

किरकोळ शरीरयष्टीचा चोर गज वाकवून कोठडीतून पळाला!

कर्नाटक काँग्रेस सरकार हिजाबवरील बंदी मागे घेण्याच्या विचारात

संसदभवन उद्घाटनावर बहिष्कार हे विरोधकांच्या वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक

मुंबई-पुणे मार्गांवरील बेशिस्त वाहनचालक सुतासारखे सरळ होतायत! कारवाईचा बडगा

तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सत्येंद्र जैन घसरले. त्यांना दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. पाठ, डावा पाय आणि खांदा दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version