घरराजकारणदिपके जिथे जातो, तिथे शिव्या खातो

दिपके जिथे जातो, तिथे शिव्या खातो

दिल्ली विमानतळावर प्रवाशांनी व्यक्त केला संताप

कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके याच्याविरोधात जनतेत संतापाची भावना आहे. दिल्लीत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर तिथे उभ्या असलेल्या लोकांनी दिपकेच्या आगमनाबरोबरच मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ ऑक्टोबर, बुधवारी, कॉकरोच जनता पार्टीचा (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके पोहोचताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेविरोधात (एसआयआर) सातत्याने प्रचार केल्याबद्दल एका प्रवाशाने दिपकेला जाब विचारला.

या घटनेच्या व्हिडिओमध्ये संबंधित प्रवासी दिपके यांना उद्देशून, “क्यूँ देश को खराब कर रहा है, भाई?” म्हणजेच, “ देशाचे वातावरण का बिघडवत आहात?” असे विचारताना ऐकू येते. त्यावर दिपके हात हलवून आणि अंगठा उंचावून प्रतिक्रिया देत तेथून पुढे निघून जाताना दिसतो. मात्र, विमानतळावरील सुरक्षा रक्षक आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर गाडीत बसतानाही लोक त्याच्यावर शेरेबाजी करताना व्हीडिओत पाहायला मिळतात.

हे ही वाचा:

प्रथमच वडील मला थेट मैदानावर खेळताना पाहतील!

सौदी अरेबियातल्या श्रीलंकन हिंदू तरुणाची फाशी रद्द

मुक्त व्यापार करारांमुळे भारताला १४० अब्ज डॉलरचा फायदा?

आशुतोष रांका, सौरव दासला पाच दिवसांसाठी पाठवले तिहार तुरुंगात

कॉक्रोच जनता पार्टीसह इतर विरोधी पक्षांकडून एसआयआर मोहिमेविरोधात आंदोलन सुरू आहे. या मोहिमेत निवडणुकीशी संबंधित गैरप्रकार होत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे. त्यावरून एकसारखी आंदोलन केली जात असल्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना आहे.

१० ऑक्टोबरला दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा होणार होता. पण त्याआधीच त्यांना दिल्लीत उतरण्यापूर्वीच विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यावेळीही विमानातील प्रवाशांनी दिपके आणि त्याच्या सहकाऱ्यांवर राग व्यक्त केला होता. देशाबाहेर चालते व्हा अशी टिप्पणी विमानातील प्रवाशांनी केली होती. शेम ऑन यू अशी प्रतिक्रियाही लोक व्यक्त करत होते. त्यावर सौरव दासलाही राग आला होता. त्यानेही एका महिलेला शेम ऑन यू अशा शब्दांत उत्तर दिले होते.

यापूर्वी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासह सीजेपीच्या काही नेत्यांना दिल्लीतील जंतरमंतर येथे परवानगी नसताना मोर्चा आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. विशेष म्हणजे, जंतरमंतर हे ठिकाण नंतर अधिकृतरीत्या मंजूर करण्यात आलेल्या आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्यात आले होते. त्यानंतर या नेत्यांनी ५० हजार रुपयांच्या जामीन हमीपत्रावर स्वाक्षरी केली. तसेच, पुढील एक वर्ष शांतता राखण्याचे आणि चांगले वर्तन ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

मात्र, त्यानंतर सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी निर्बंधांचे उल्लंघन करून पुन्हा जंतरमंतर येथे प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात दोन प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केले आहेत.

या प्रकरणात बेकायदेशीर प्रवेश, बेकायदेशीर जमाव जमवणे, अधिकृत आदेशांचे उल्लंघन करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्ये पार पाडण्यापासून रोखणे, असे आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, सीजेपीच्या १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनापूर्वी पक्षाच्या समर्थकांकडून आंदोलकांना तोडफोड, हिंसाचार आणि बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी चिथावणी दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. याशिवाय, जुलै महिन्यात सरकारविरोधात झालेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान हिंसाचाराच्या गंभीर घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनांमध्ये अनेक पोलिस कर्मचाऱ्यांवर गंभीर हल्ले झाल्याचेही संबंधित वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version