घरराजकारणप्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; शेलारांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; शेलारांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’ या सुविधेचे शुक्रवारी १४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही अशी टीका विरोधी पक्षावर केली होती. यावरून भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून सामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्न विचारात टोला लगावला आहे.

आशिष शेलार यांनी मुंबईतील समस्यांवर भाष्य केले असून पालिकेचा कारभार आणि भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का? गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का? ११४ टक्के नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते? असे प्रश्न आशिष शेलार यांनी विचारले आहेत.

मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात २२ हजार ५०० कोटी खर्च करुन ही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा? वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले? मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले? परिक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे? ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे कसे? मुंबईत गेल्या ११ वर्षात ४० हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली? असे सामान्य जनतेचे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा:

‘स्थायी समितीत भ्रष्टाचारावर बोलू देत नाहीत’; महापौरांना लिहिले पत्र

या कारणामुळे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

२४ तासात देशात अडीच लाख कोरोना रुग्ण

हरिद्वारच्या धर्मसंसदेतील ‘चिथावणीखोर’ वक्तव्ये : दुसरी बाजू

कोस्टलरोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा? मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले? मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले? असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू! कारण… प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही, असा टोला आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version