घरक्राईमनामामालेगाव बॉम्बस्फोटात योगी आदित्यनाथ यांना गोवण्यासाठी एटीएसने केला साक्षीदाराचा छळ

मालेगाव बॉम्बस्फोटात योगी आदित्यनाथ यांना गोवण्यासाठी एटीएसने केला साक्षीदाराचा छळ

- Advertisement -

२००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील खटल्यात आता नवा ट्विस्ट आला आहे. मालेगाव खटल्यातील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अर्थात एनआयएच्या विशेष न्यायालयात राज्यातील एटीएस विरोधात खळबळजनक असा दावा केला आहे. मालेगावच्या खटल्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही व्यक्तींना गोवण्यासाठी एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाने दबाव टाकल्याचा आणि त्यासाठी छळवणूक केल्याचा गौप्यस्फोट या साक्षीदाराने केला आहे.

या दाव्याने आता मालेगाव खटल्यात एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. २००८ साली महाराष्ट्रातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे केला जात आहे. या तपासात सध्या अनेक नवे गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. अत्तापर्यंत या खटल्यातील तब्बल १३ साक्षीदारांनी आपल्या साक्षी फिरवल्या आहेत. या तपासात त्यांनी आधी नोंदवलेल्या साक्षीपासून त्यांनी फारकत घेतली आहे. आपण अशी साक्ष दिलीच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता

नासाचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी जान्हवी दांगेती ठरली पहिली भारतीय   

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडला अटक

दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर

तर आता एका साक्षीदाराने थेट एटीएसवरच आरोप केले आहेत. सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन लोकसभा खासदार योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीयता स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या चार लोकांना गोवण्यासाठी एटीएसने छळ केल्याचा आरोप या साक्षीदाराने केला आहे. या पाच जणांच्या विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी एटीएसने दबाव टाकल्याचे या साक्षीदाराने म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे सवाल उपस्थित होताना दिसत आहेत. एटीएसच्या मागून नेमके कोणाचे हात हिंदुत्ववादी संघटनांना गोवण्यासाठी प्रयत्न करत होते का? असा सवाल विचारला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version