घरराजकारणशरद पवार हे देशातील फोडाफोडी, खंजीर संस्कृतीचे रोल मॉडेल

शरद पवार हे देशातील फोडाफोडी, खंजीर संस्कृतीचे रोल मॉडेल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देशातील फोडाफोडी आणि खंजीर संस्कृतीचे रोल मॉडेल आहेत असा टोला भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी लागावला आहे. भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये नवे राजकीय नाट्य रंगले. या नाट्याचा क्लायमॅक्स म्हणजे सांगली महापालिकेत झालेले सत्तांतर. या सत्तांतरात भारतीय जनता पार्टीला धक्का देत विरोधकांनी आपली सत्ता स्थापन केली. यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नगरसेवकांची राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी भेट घेतली. सांगलीतील सत्तांतराचे सारे तपशील पवार यांनी माहिती करून घेतले. या वेळी प्रतिक्रिया देताना पवारांनी भाजपावर खोचक टीका केली. भाजपाने काही राज्यांत जनमताचा अनादर करत सत्ता हस्तगत केली. सांगलीतून त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात झाली आहे. ही घटना चांगली आहे असे पवार म्हणाले.

हे ही वाचा:

“गुन्हा दाखल करणे म्हणजे न्याय करणे होत नाही” – उद्धव ठाकरे 

पवारांच्या याच टिकेवरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतातल्या फोडाफोडी आणि खंजीर संस्कृतीचे रोल मॉडेल शरद पवारच आहेत, फक्त त्यांना खंजीर खुपसून नंतर लोटांगण घालण्याची कलाही अवगत आहे असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version