घरराजकारणपॉन्झी स्कीम्सवर लक्ष ठेवणाऱ्या इंटेलिजन्स युनिट्सचे काय झाले?

पॉन्झी स्कीम्सवर लक्ष ठेवणाऱ्या इंटेलिजन्स युनिट्सचे काय झाले?

ठेवीदारांच्या फसवणुकीबाबत आमदार भातखळकरांनी विचारले सवाल

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या‌ बुधवारच्या कामकाजात ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यासाठी सरकारने मांडलेल्या विधेयक क्रमांक ४६ चे स्वागत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आणि पॉन्झी स्कीमसारख्या माध्यमातून होणारी ठेवीदारांची फसवणूक रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची पूर्ती होते आहे का, यावर काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

ते म्हणाले की, पैसे दुप्पट करून देणाऱ्या पॉन्झी स्कीमवर लक्ष ठेवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात आली होती. या युनिटची सद्यस्थिती काय? या युनिटच्या माध्यमातून नेमकी काय कामगिरी करण्यात आलेली आहे, याबाबतचा तपशील देण्यात यावा.

विधिमंडळात त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, ठेवीदारांच्या ठेवींचा मुद्दा हा सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या कायद्यासंदर्भात सुधारणा केल्या. या काय़द्याचा हेतू चांगला आहे. ठेवीदारांचे पैसे घेतले जातात त्यांचा वापर गैरमार्गाने केला जातो. अशा प्रकरणांना तहकूब करून वेळकाढूपणा केला जातो. ही तिसरी तहकुबीची प्रक्रिया रद्द व्हावी.

हे ही वाचा:

विम्बल्डनमध्ये सेरेनाच्या पुनरागमनाला धक्का

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, ५ दिवसाचा रेड अलर्ट

अमेरिकेत उष्णतेचा कहर!

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण

अतुल भातखळकर म्हणाले की, ठेवीदारांचे पैसे घेऊन लोक भ्रष्टाचार करतात. अनेक लोक १८ टक्के, २४ टक्के व्याज देण्याच्या, पैसे दुप्पट होतील अशी आमिषे दाखवून लोकांना भुलवतात. या आमिषातून लोक ठेवी ठेवतात. या योजना जर पॉन्झी स्कीम असतील, तर त्यांचे उद्देशच लोकांना फसवण्याचे असतात. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी इन्टेलिजन्स युनिट स्थापन करण्याचं ठरवलं होतं. मध्यंतरी असं प्रसिद्धीस आलं होतं की असे युनिट बंदच केलं आहे. ते युनिट अजून सुरू आहे का, ते कोणत्या कार्यक्षमतेने काम करत आहे, याबद्दल माहिती मिळावी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version