घरराजकारण‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यातील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उडवत असल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्रीच आता त्यांची तारीफ करत आहेत. त्यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत बेछूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भंगारवाले आहेत. अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत, असे खरमरीत ट्विट आमदार भातखळकर यांनी केले आहे.

आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी सुरु केलेल्या आरोपांच्या मालिकेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाने नवाब मलिक यांची स्तुती केल्याची माहिती समोर येते आहे. यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

 

हे ही वाचा:

नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कोण ठरणार सरस?

ऑफिसच्या वेळेनंतर बॉसने फोन करणे आता बेकायदेशीर

राजकीय वातावरण तापलेले असतानाच नड्डा मुंबईत

नवाब मलिकांच्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्ड जमीन प्रकरणी ईडीच्या धाडी

 

 

मलिकांनी आता थांबावे

दुसरीकडे मलिक यांनी आता थांबले पाहिजे असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्याचे समजते. मलिक हे गेल्या काही दिवसांपासून बेताल आरोप करत असल्याची टीका होत आहे. त्याची जाणीव आता महाविकास आघाडीला झाल्याचे राऊत यांच्या विधानावरून म्हटले जात आहे. दिल्लीत बोलताना ते म्हणाले, कधी कुणाबरोबर फोटो असेल तर तो पुरावा होऊ शकत नाही. निवडणुकीच्या राजकारणासाठी राजकारण कोणत्या थराला गेले आहे? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणी तरी कर्त्या नेत्याने हस्तक्षेप केला पाहिजे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version