घरराजकारण'संजय राऊत हेच उद्धव ठाकरेंना घेऊन डुबणार!'

‘संजय राऊत हेच उद्धव ठाकरेंना घेऊन डुबणार!’

शिवसेना खासदार संजय राऊत यांची बहुचर्चित पत्रकार परिषद पार पडली. संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेत भाजपच्या काही नेत्यांवर आरोप केले. पत्रकार परिषद संपल्यानंतर काहीच वेळात किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार सुरू केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. काल संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला कार्यकर्ते जरी मोठ्या संख्येने जमले असले तरी शिवसेना आमदार किंवा सरकारमधील नेते का उपस्थित नव्हते? असा खोचक सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत बोलतात मोहीत कंबोज फडणवीसांना घेऊन डुबणार पण त्याची काळजी तुम्ही करू नका. संजय राऊत हेच उद्धव ठाकरेंना घेऊन डुबणार आहेत. पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारे संजय राऊत शिवसेनेची वाट लावणार आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेनेला त्यांचे नेते गोळा होत नव्हते, मोठ्या मुश्किलीने माणसे जमवावी लागली अशी टीका संजय राऊत यांच्यावर करण्यात आली आहे. संजय राऊतांबरोबर एकनाथ शिंदे का नव्हते? असा थेट सवाल करत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेतल्या अंतर्गत मतभेदांवर बोट ठवले आहे.

हे ही वाचा:

मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!

‘२५ हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणताय, मग तुम्ही काय दोन वर्ष झोपला होता का?’

भारत की वेस्ट इंडिज? कोण ठरणार टी-२० चा दादा?

‘त्या १९ बंगल्यांचा कर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर भरतायत’

त्यापूर्वी आज सकाळी किरीट सोमय्या यांनी देखील संजय राऊत यांच्यावर घाणाघाती टीका केली. कोरलाई येथे बंगले नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र, त्या बंगल्यांच्या कर रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर भरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी देखील संजय ठाकूर यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असे संजय राऊत म्हणाले. पण तुम्ही काय दोन वर्ष झोपला होता का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version